BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वासराव नाईक महाविद्यालयास युवा महोत्सवात तीन पारितोषिक |Vishwasrao Naik College won three prizes in the Youth Festival




शिराळा: विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द येथे संपन्न झालेल्या सांगली जिल्हा युवा महोत्सव २०२३ मध्ये  यश संपादन केले. या महोत्सवात महाविद्यालयाला लोकनृत्य व्दितीय, वादविवाद प्रथम, मराठी वक्तृत्व द्वितीय अशी एकूण ३ पारितोषिके मिळाली.या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. भगतसिंग नाईक, सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांची निवड ११ ते १३ ऑक्टोबर रोजी दहिवडी ,सातारा येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय युवामहोत्सवासाठी  झाली आहे. 

लोकनृत्य मध्ये  दीपलक्ष्मी पाटील, सुप्रिया सातपुते, अभिषेक रोकडे, अक्षता देवकुळे, सलोनी कुंभार, नेहा सुतार, रागिणी वाघमारे, हर्षदा शेणवी, साक्षी पाटील यांनी व्दितीय, सुफीया नायकवडी, अमृता शिंगटे यांनी वादविवाद मध्ये प्रथम तर मराठी वक्तृत्व  मध्ये सुफीया नायकवडी हिने व्दितीय क्रमांक मिळवला. त्यांना  प्राचार्य डॉ . राजेंद्र बनसोडे, उपप्राचार्य राजसिंग पाटील, उपप्राचार्य भिमराव दशवंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब कांबळे व डॉ. उज्वला बिरजे, इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments