शिराळा,ता.४:पुणे येथे झालेल्या १३ व्या हाफ किडो राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. साहिल तानाजी कांबळे सुवर्णपदक, अफताप अहमद सय्यद सिल्वर पदक, कुणाल कृष्णात यादव ब्राँझ पदक, हणमंत भोपाळ माने याने ब्रांझ पदक प्राप्त केले. या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक, संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, प्राचार्य डॉ. राजेंद्र बनसोडे, क्रीडाशिक्षक डॉ. विनायक भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अॅड भगतसिंग नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजसिंह पाटील, भीमराव दशवंत, डॉ. तानाजी हवालदार उपस्थित होते.
0 Comments