शिराळा,ता.१: फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघातर्फे प्रति वर्षीप्रमाणे दिपावली निमित्त संघास दुध पुरवठा करणाऱ्या शेतकरी दूध उत्पादकांना म्हैस दूध प्रती लिटर रूपये २.५० पैसे व गाय दुध प्रती लिटर रूपये १. १० पैसे असे फरक बील देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली.
यावेळी नाईक म्हणाले, ७.० फॅट च्या वरील म्हैस दुधासाठी पती लिटर रू २.५० पैसे व फॅट ६.० एस.एन.एफ ९.० म्हैस दूधासाठी प्रती लिटर २.३० पैसे आणि गाय दुधासाठी प्रती लिटर रू. १.१० पैसे फरक बिल आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार व संचालकांच्या सहमतीने देत संघाने चांगल्या पध्दतीने फरक बिल देण्याची परंपरा राखली आहे. यातील म्हैस दूध व गाय दूध मधील प्रती लिटर ०.१० पैसे संघाच्या प्रकल्प विकास निधी करीता कपात करण्यात येणार आहे. त्याच बरोबर संघाच्या कर्मचा-यांसाठी ८.३३ % (एक (पगार) बोनस व फत्तेसिंगराव नाईक पगारदार सेवक पतसंस्थेमार्फत कर्मचा-यांना दिपावलीच्या विविध वस्तू संच भेट देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी दूध उत्पादकाने स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनास महत्व दिल्यास निश्चीतच त्यांच्या दूधास चांगला दर मिळत जाईल. लहान व मोठया दूध उत्पादन करणा-या दूध उत्पादकांनी पारंपारीक दूध व्यवसायास आधुनिक शास्त्रीय व फायदेशिर ठरणा-या बाबींची जोड दिल्यास उत्पादित होणा-या दूधाच्या क्षमता, चव व गुणवत्ता यामध्ये वाढच होईल. ज्यावाढीमुळे त्यांच्या व्यावसायिक उत्पनांत फायदाच होईल. दूध व्यवसाय फायदयात आणण्यासाठी जाणीवपूर्वक पशुखाद्य कमी खर्च व विविध वैरणींची नियोजनबध्द उपलब्धता करणे महत्वाचे आहे. भविष्यकाळात नविन दूध उत्पादक तयार करणेसाठी संघाकडून जाणिव पूर्वक प्रयत्न केले जातील. बेरोजगार तरूणांना व कुटुबांची आर्थिक क्षमता वाढविणेची अपेक्षा असणा-या करिता हा दूध व्यवसाय निश्चीतच फायदेशिर ठरू शकतो. मुंबई येथील सुरू होणारा दूग्ध प्रकल्प हा शिराळा तालुक्यातील धवल क्रांतीस वेगळी दिशा व यशस्वीतेचा उंची देणारा प्रकल्प ठरेल.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, संचालक संजय पाटील, श्रीरंग भोसले, बबन पाटील, अनिल पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी यमगर, शिवाजी लाड, गणेश पाटील, माणिक दशवंत तुकाराम सावंत, लक्ष्मण पाटील, नामदेव पडवळ, शरद पाटील, प्रणव पाटील, संजय शिंदे, मंगला पाटील, रूपाली पाटील, मनिषा यादव, व्यवस्थापक दिनकर नायकवडी व कार्यकारी संचालक रविंद्र यादव, भूषण नाईक उपस्थित होते.
0 Comments