BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटारसायकल अपघातात तीन जखमी | Three injured in motorcycle accident

 


शिराळा:येथील शिराळा इस्लामपूर मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोर दोन मोटारसायकलिंची समोरासमोर धडक होऊन तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटना काल  शनिवारी रात्री साडे आठ च्या दरम्यान घडली.

   याबाबत माहिती अशी की , जखमी दिनेश सुर्जराम कुमावत ( वय ३२ , रा.इस्लामपूर ) हे आपले शिराळा तहसील कार्यालयाजवळ असणारे मार्बल चे दुकान बंद करून इस्लामपूर ला मोटारसायकलवरून घरी निघाले होते. तर तानाजी बापूसाहेब इंगवले ( वय ४५) , संदेश भीमराव इंगवले ( वय २१ , दोघे रा.खेड , ता.शिराळा) हे मोटारसायकल  वरून खेड कडे निघाले होते. या दोन्ही मोटारसायकल ची समोरासमोर धडक झाली . यामध्ये तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात डॉ.अनिरुद्ध काकडे यांनी प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील  उपचारासाठी पाठवले आहे.

Post a Comment

0 Comments