शिराळा,ता.८: एकलव्या सारखे स्वतःला शिकवले. कुतूहल जागे ठेवण्यासाठी लिखाण केले. आपणाला नसणारे ज्ञान मिळवण्यात फार मोठा आनंद मिळतो असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी केले.
शिराळा येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणात कै.माजी आमदार वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड भगतसिंग नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक होते.
यावेळी गोडबोले म्हणाले,मी कोणत्या ही विषयात तज्ञ् नसून अजून ही विध्यार्थी म्हणूनच शिकत आहे. विषयांचे मुलतत्व जाणून घ्यायची मला नेहमी ओढ आहे. कोणत्याही विषयता खोलवर शिरण्याचा ध्यास असायला हवा. कोणत्या ही गोष्टीचे कुतूहल जागे ठेवणे महत्वाचे आहे. प्रत्येक विषयातील सौंदर्य टिपून त्याचा गाभा ओळखणे महत्वाचे आहे.
अॅड .भगतसिंग नाईक म्हणाले, कै.माजी आमदार वसंतराव नाईक यांनी निरपेक्ष भावनेतून लोकांची सेवा केली. त्यामुळे त्यांची प्रतिमा जनसामान्य लोकांच्या मनात कायम घर करून राहिलेली आहे. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांचा जीवन गौरव पुरस्कार व आजच्या तरुणाई ला प्रेरणादायी ठरणाऱ्या व वेगवेगळ्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या तालुक्यातील सुपुत्रांचा नागभूमी भूषण पुरस्कार देवून सन्मान केला जात आहे.
यावेळी गोडबोले यांच्या हस्ते मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार कै.धोंडीराम लक्ष्मण पोटे यांना तर नागभूमी भूषण पुरस्कार सह्याद्री फार्मस् लिमिटेड नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब पांडुरंग काळे यांना देण्यात आला आहे. संस्थेतील आदर्श शिक्षक म्हणून संदीप रोकडे व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून अय्याज पठाण यांनाही सन्मानित करण्यात आले. शालेय स्पर्धेत यश मिळवलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप रोडके,गौतम पोटे, आबासाहेब काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक एस.एम.पाटील यांनी केले. यावेळी अमरसिंह नाईक,रणजितसिंह नाईक,विश्वप्रतापसिंह नाईक, प्रमोद नाईक, वसंत पोटे ,सुरेशराव चव्हाण, पी.व्ही.पाटील, विश्वास कदम, राजेंद्र पाटील, सनी पाटील, श्रीकांत पाटील,दुर्गा पाटील,नम्रता नाईक,लताताई पाटील उपस्थित होते. आभार पृथ्वीसिंग नाईक यांनी मानले.
0 Comments