शिराळा,ता.२१:कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. महाविकास आघाडी सरकारने अनेक निर्णय लोकांसाठी अन्याय कारक ठरणारे घेतले आहेत. विरोधकाकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे.असा आरोप भाजपा नेते, हातकणंगले लोकसभा मतदार संघ भाजपा प्रमुख सत्यजित देशमुख यांनी केला.
शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी च्या वतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले. त्याला जबाबदार असणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी विरोधात निषेधाच्या घोषणा बाजी करण्यात आली.
देशमुख म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे असताना कंत्राटी नोकर भरतीची सुरुवात झाली. त्यानंतर दोन मुख्यमंत्री राज्यामध्ये झाले .त्यांनी ही पद्धत असतीच सुरु ठेवली. मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असताना याची अधिसूचना काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने काल कंत्राटी नोकर भरतीचा जी आर रद्द केला. त्याचा फायदा तरुणाना होणार आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी शिराळा मंडल अध्यक्ष हणमंतराव पाटील, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष के. डी. पाटील, विश्वास माजी संचालक रणजितसिह नाईक,जिल्हा भाजपा सिटणीस सम्राट शिंदे,धनाजी नरुटे, अशोक पाटील,जयवंत शिंदे, नारायण खोत,सरपंच शुभम खोत, सरपंच नाना शेळके, सरपंच संभाजी पाटील,निलेश आवटे,आशिष कदम,कुलदीप निकम, शुभम देशमुख,रमेश पाटील,प्रदीप कदम,अरविंद शिंदे, भिमराव बोने, प्रदीप पाटील,श्रीरंग गायकवाड, प्रसाद पाटील,काका यादव, पोपट देसाई आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments