BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विराज पशुखाद्यावर साखर भेट योजना |Sugar Gift Scheme on Viraj Pashukhady




शिराळा ,ता.२२: येथील विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या पशुखाद्य निर्मिती विभागामार्फत २१  ऑक्टोबर ते २०  नोव्हेंबर या कालावधीत दसरा ते दिवाळी साखर भेट योजना राबविण्यात येत आहे, ही माहिती अध्यक्ष विराज नाईक यांनी दिली.

ते म्हणाले, पशुखाद्य निर्मिती विभागामार्फ मच मोअर मिल्क प्लस पॅलेट, पौष्टीक, सकस व धवल क्रांती अशी उत्पादने घेतली जातात. सर्व उत्पादने दर्जेदार असून त्याच्या दैनंदिनी वापराने दुधात वाढ होते. पशूंचे आरोग्य चांगले राहून ते सुधारते. सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे वर्षातून एकदा दसरा ते दिवाळी कालावधीत ग्राहकांना भेट देण्यात येते. या वर्षांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. उत्पादनांच्या प्रत्येक पोत्यासोबत १  किलो साखर भेट असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जास्तीत जास्त खरेदी करून या योजनेचा लाभ घ्यावा. यावेळी  कन्सल्टंट जगदीश कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी विश्वजीत नलवडे, प्लॅंट चालक रवींद्र सोरटे, विक्री प्रतिनिधी अमोल पाटील, अशोक साळुंखे उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments