शिराळा,ता.४:सांगली येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा मध्ये चॅम्पियन कॅरम अकॅडेमी शिराळाच्या खेळाडूंनी यश मिळवले. यामध्ये १४वयोगट मुलामध्ये यशराज पवार तर मुलीमध्ये प्रथम मैथिली पाटील, द्वितीय ऋतुजा कांबळे,१७वयोगट मुला मध्ये प्रथम क्रमांक आजाण मुजावर, द्वितीय संस्कार कांबळे, हेमराज सवाईराम तृतीय,१७ वयोगट मुली मध्ये प्रथम राजलक्ष्मी पोतदार,द्वितीय अनुजा बागल, तृतीय अनुष्का गायकवाड,१९ वयोगट मुलीमध्ये प्रथम तन्वी पाटील, द्वितीय उत्कर्षां दिवे. सातारा जिल्ह्यात संस्कृती दळवी हिने १७ वर्ष वयोगटा मध्ये प्रथम क्रमांक पटकवला.प्रशिक्षक मोहसीन नदाफ, संकल्प कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.या खेळाडूची निवड विभागीय कॅरम स्पर्धेसाठी झाली आहे.
0 Comments