शिराळा.ता.२७ :जनउत्कर्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.वाकुर्डे खुर्दच्या अध्यक्षपदी शांताराम जाधव तर उपाध्यक्षपदी विष्णू सावंत यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.डी.लाड यांनी काम पाहिले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी ए.डी.लाड यांनी केला. यावेळी संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर,संचालक के.वाय.भाष्टे, श्रीकृष्ण हारुगडे , रामचंद्र गुरव,आनंदा जाधव,जनार्धन कांबळे,शिवाजीराव चौगुले,रघुनाथ धुमाळ, अशोक काटकर,प्रदीप गायकवाड,तानाजी शिंदे, शोभा पाटील,सुनंदा मस्के उपस्थित होते. सभासदांचे हित जोपासण्यासाठी काटकसर, नीटनेटके नियोजन आणि पारदर्शक व्यवहार ही गेले २३ वर्षे संस्थेची असणारी परंपरा या पुढे कायम ठेवून संस्थेचा नावलौकिक वाढऊ असे मत नूतन अध्यक्ष शांताराम जाधव व उपाध्यक्ष विष्णू सावंत यांनी व्यक्त केले. स्वागत संस्थापक विजयसिंग खांडेकर तर प्रास्ताविकके.वाय.भाष्टे यांनी केले . आभार मुख्य व्यवस्थापिका अंजना खांडेकर यांनी मानले.
0 Comments