BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपंग प्रमाणपात्रासाठी ३०० रुग्णांची तापसणी|Screening of 300 patients for disability certificate

 शिराळा : येथील उप जिल्हा रुग्णालयात  विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष विराजदादा नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग प्रमाणपत्रे मिळण्यासाठी प्राथमिक  तपासणी व नोंदणी शिबिरात सुमारे 300 अस्तिव्यंग, मानसिक व डोळे रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचे हस्ते फित कापून तर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे  उद्घाटन झाले.  स्वागत ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले. उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वासचे संचालक विश्र्वास कदम , यशवंत निकम, अजय जाधव, संजय हिरवडेकर ,सुनील कवठेकर,अमित गायकवाड,ॲड.अक्षय कदम,रमेश कांबळे, विनोद कदम,वासीम मोमीन, प्रताप मुळीक, प्रणव पाटील, दीपक पिसाळ,राजेंद्र निकम,उत्तम डांगे,बाजार समिती उपसभापती विजय महाडिक,गिरजवडेचे सरपंच सचिन देसाई, आरळा माजी उपसरपंच सदाजी पाटील ,किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे उपस्थित होते. वैद्यकिय अधीक्षक डॉ. नूतन कणसे, डॉ. प्रज्ञा पाटील, दीपाली खरात, डॉ. येलूरकर, डॉ. गायत्री वडगावे, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद, गजानन साकेकर, सूरज जगम यांनी रुग्णांच्या तपासणीचे काम पाहिले.

Post a Comment

0 Comments