शिराळा:शिराळा पंचायत समिती येथे भ्रष्टाचार निर्मूलन समिती सांगली जिल्हा सदस्य सुदाम पाटील यांचा सत्कार करताना बाळासाहेब पाटील
शिराळा,ता.१३: शिराळा तालुक्यातही माहिती अधिकार कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. जनजागृती केल्याने तालुक्यातील भ्रष्टाचार कमी होईल. जनजागृतीच्या माध्यमातून माहितीचा अधिकार घरा घरात पोहचला पाहिजे .निष्ठावंत युवा सामाजिक कार्यकर्ते तयार करावे लागतील.असे प्रतिपादन भ्रष्टाचार निर्मूलन समिती सांगली जिल्हा सदस्य सुदाम पाटील यांनी केले.
शिराळा पंचायत समिती येथे दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते. सुदाम पाटील यांचा सत्कार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले, निष्ठावंत युवा सामाजिक कार्यकर्ते तयार करावे लागतील.माहिती अधिकार कसा वापरायचा हा समाजातल्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तिपर्यंत पोहचला पाहिजे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, तालुका हा भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला आहे .त्यातून तालुका मुक्त झाला पाहिजे. टक्केवारीमुळे तालुक्याचा विकास होत नसून कामाचा दर्जा ही खालावला आहे.यावेळी अधीक्षक भरत पाटील, आर. जे. पाटील, प्रवीण खोत, अक्षय पाटील, सचिन भिसे उपस्थित होते. आभार मारुती रोकडे यांनी मानले.
0 Comments