शिराळा तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लागलेल्या २९ ग्रामपंचायत पैकी ५ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. २९ सरपंच पदापैकी ६ बिनविरोध व एक पद रिक्त राहिल्याने तर २२ सरपंच पदासाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत. २२१ सदस्य पदातील ६६ बिनविरोध झाल्याने व १ रिक्त पद राहिल्याने १५४ जागेसाठी ३४३ उमेदवारी रिंगणात होते. त्यासाठी मतदान झाले आहे.
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झाले. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली. कोण विजयी पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
शिराळा,ता.२० :शिराळा तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ११७ तर सदस्यपदासाठी ६०० अर्ज दाखल झाले होते. आज छाननीमध्ये सरपंच पदासाठीचा १ व सदस्य पदासाठीचे ३ असे करुंगली ,रिळे,धसवाडी,कुसळेवाडी या चार गावातील चार अर्ज अवैद ठरले आहेत. त्यामुळे २९ सरपंच पदासाठी ११६ तर २२१ सदस्यपदासाठी ५९७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. कोणत्या पदाचे अर्ज अवैद ठरले हे खाली चार्ट मध्ये असलेल्या त्या त्या ग्रामपंचायत वर क्लिक करू पहा
शिराळा तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीआज शुक्रवारी शेवटच्या दिवशी एकूण सरपंच पदासाठी ११७ तर सदस्यपदासाठी ६०० अर्ज दाखल झाले आहेत.गिरजवडे येथील पोट निवडणुकीसाठी एक ही अर्ज प्राप्त झालेला नाही.
शिराळा तालुक्यात २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी आज चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ३४ तर सदस्य पदासाठी २१७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल झाले आहेत.आंबेवाडी, खुजगांव, पाचगणी व मानेवाडी या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
शिराळा तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज बुधवारी तिसऱ्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली . यामध्ये सरपंच पदासाठी ३३ तर सदस्य पदासाठी ८० असे एकूण ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
सोमवारी १६ ऑक्टोंबर व मंगळवारी १७ ऑक्टोंबर रोजी अर्ज भरण्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी
एक ही अर्ज दाखल झाला नाही.
आज शुक्रवारी कोणत्या गावात किती अर्ज भरले पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
-----------------------------------------
शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायत पैकी पहिल्या टप्यात ६० ग्रामपंचायत च्या निवडणुका डिसेंबर २०२२ ला झाल्या असून दुसऱ्या टप्यात २९ ग्रामपंचायत च्या निवडणुका नोव्हेंबर २०२३ मध्ये होत आहेत.
कोणत्या गावात कोणते आरक्षण, प्रभाग किती,मतदार किती, अर्ज आले किती ,उमेदवार कोण, विजयी उमेदवार व मतदान निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत व होणाऱ्या ग्रामपंचायत ची माहिती गाव निहाय वाचा त्या त्या ग्रामपंचायत च्या नावावर क्लिक करून ,
आज सोमवारी १६ ऑक्टोंबर रोजी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सर्वर प्रॉब्लेम असल्याने फॉर्म भरण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे कोणत्या गावात किती अर्ज भरले पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
---------------------------------------------
आज बुधवारी २५ ऑक्टोंबर रोजी अर्ज माघारी असल्याने कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आणि कोणत्या गावात काट्याची लढत होणार याची माहिती खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
0 Comments