BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादी क्रमांक एक वर ठेवा |Put nationalists at number one




शिराळा : तालुक्यात सर्व पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकवर असून आगामी 29 ग्रामपंचायत निवडणूकीतही तो नंबर एक वर ठेवा, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक केले.

चिखली (ता. शिराळा) येथे तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात लागलेल्या 29 गावातील ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, विराज इंडस्ट्रिजचे अध्यक्ष विराज नाईक, तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे व भूषण नाईक प्रमुख उपस्थित होते.

आमदार श्री. नाईक म्हणाले, गावपातळीवर विकासाची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीत आपल्या पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे. म्हणजे गावचा विकास साध्यात अडचणी येत नाहीत. अन्यथा विरोधाला विरोध म्हणून ठरावीक मंडळी गावच्या विकासाला खिळ घाण्याचा उद्योग करतात. मी आतापर्यंत निवडणूकीपुरते राजकारण मर्यादित ठेवला. इतर सर्ववेळी विकासाचे समाजकारण केले. म्हणून तर शिराळा विधानसभा मतदार संघात अखंडपणे विकास विकास सुरू आहे. एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. कार्यकर्त्यांनी सर्व ग्रामपंचायतीवर आपल्या विचाराची सत्ता आणावी. 

यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, कार्यकर्त्यांनी जूना व नवा या वादात अडकू नये. विरोधक मत याचा फायदा घेतील. सर्वांनी हात हात घालून एकसंधपणे आमदार मानसिंगभाऊ व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या विचाराची सत्ता ग्रामपंचायतीवर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी. जातीचे प्रमाणपत्र काढण्यास सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. या टप्प्यातील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची झेंडा फडकवावा.

विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यात बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता आहे. ती कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घ्यावेत. आपण केलेली व करत असलेली कामे लोकांच्या लक्षात आणून द्यावीत. आमदार मानसिंगभाऊंनी प्रत्येक गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातुन लोकहिताचा विकास होतो आहे. विरोधकांनी कांहीही काम केले नसून ते फक्त कांगावा करत आहे, हे कार्यर्त्यांनी लोकांच्या लक्षात आणून द्यावे. प्रारंभी कार्यकर्त्यांकडून नेते मंडळींनी गाववार आढावा घेतला. बैठकीस निवडणूक असलेल्या 29 गावातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व विश्वास, विराज व यशवंत उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments