शिराळा,ता.४ :कै. माजी आमदार वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता शिवछत्रपती विद्यालय येथे कै. माजी आमदार वसंतराव नाईक व्यासपीठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक यांनी दिली.
यावेळी नाईक म्हणाले, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार कै. धोंडीराम लक्ष्मण पोटे यांना तर नागभूमी भूषण पुरस्कार सह्याद्री फार्मस् सस्टेनेबल ग्रासरूटस ईनीशीएटीव्हज लिमिटेड, नाशिक चे सीईओ आबासाहेब पांडुरंग काळे यांना देण्यात येणार आहे. संस्थेतील आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. संस्था अंतर्गत झालेल्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे पारितोषिक वितरणही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ विचारवंत व लेखक अच्युत गोडबोले हे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड भगतसिंग नाईक हे आहेत. आमदार मानसिंगराव नाईक, संस्था सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, उपाध्यक्ष,पृथ्वीसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थितीआहे. यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष पी. व्ही. पाटील, उपाध्यक्ष ए. एम. कुंभार, सचिव ए. एन. काझी, संचालक डॉ तानाजी हवालदार, जगन्नाथ बाऊचकर उपस्थित होते.
0 Comments