शिराळा,ता.२९: येथील शिराळा सखी मंच व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न झाला. आपला बझारच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक व महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. अध्यक्षस्थानी डॉ. वंदना म्हात्रे होत्या. स्वागत प्रास्ताविक महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी केले. आदीश्री कदम हिने छत्रपती शिवरायांचा पोवाडा सादर केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. सहाय्यक नगर रचनाकार सोनाली प्रदीप काकडे (शिराळा), मंत्रालय सहाय्यक रीना सुनील पाटील व अभियंता जलसंपदा विभाग स्वाती राम पाटील (दोघी कणदूर), राज्य गुन्हे अन्वेषण विभाग साताराच्या पोलीस उपअधीक्षक मनीषा पाटील (सातारा), पेठ वडगावच्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना हंबीरराव पाटील (हातकणंगले), मुंबई पोलीस काजल आनंदा पावले (पावलेवाडी), पोलीस उपनिरीक्षक मुंबई स्नेहल संदीप चरापले( मांगले) व पूजा संदीप पाटील (कांदे), सहायक अभियंता श्रेणी एक सोनिया दिनकर महिंद (शिराळा), जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता कल्याणी अंकुश पाटील (रेठरे धरण) यांनी नवदुर्गा सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी विशेष सन्मान शोभा पाटील (काळुंद्रे) यांना देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सखी मंचच्या सदस्यसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात वनिता दत्ता माने व सुमन वसंत तांबिरे (मांगरूळ), छायाताई धोंडी गायकवाड (उपवळे) या विजेत्या ठरल्या. कार्यक्रमाचे निवेदन सविता साळुंखे यांनी केले. राज डान्स अकॅडमीने नवदुर्गा थीम डान्स, तर गिरजवडेच्या पथकाने लेझीम सादरीकरण केले. कार्यक्रमास सखी मंचच्या व महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शुभांगी देसाई यांनी आभार मानले.
0 Comments