मांगले,ता.१०: मांगले.(ता.शिराळा) येथे मोरणा उद्योग समूहा व शिराळा तालुका जागृत ग्राहकराजा संस्थेच्या वतीने मोरणा उद्योग समूहाचे संस्थापक स्व.विलासराव पाटील यांच्या तृतीय व मोरणा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष स्व.नवीनकुमार विलासराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने गुरुवार (ता. १२) ऑक्टोंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता विलासराव पाटील धनटेक पाणी पुरवठा संस्था सभागृहात ग्राहक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे.या वेळी विलासराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या विध्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ होणार असल्याची माहिती शिराळा तालुका जागृत ग्राहकराजा संघाच्या महिलाध्यक्षा सारिका पाटील व मोरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सत्यजित विलासराव पाटील यांनी दिली.
मांगले येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. यावेळी पाटील म्हणाल्या ,या शिबिरात ग्राहकांना जागृत ग्राहकराजा संघाचे राज्याध्यक्ष दिलीप फडके, ग्राहक गा-हाणे निवारण मंच. व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अजय भोसरेकर आणि ग्राहक तक्रार निवारण मंच,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ.बारामती,कोल्हापूर, रत्नागिरी परिमंडळचे श्रीकांत बाविस्कर हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ग्राहक जागृती व विद्युत वितरण बाबत लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी बद्दल चर्चा करण्यात होणार आहे, कार्यक्रमास तहसीलदार शामला खोत-पाटील,गट विकास अधिकारी संतोष राऊत,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,जागृत ग्राहकराजा संघ राज्य संघटक दिलीप पाटील ,जागृत ग्राहकराजा संघ.सातारा जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ स्वामी,राज्य महिला संघटक शैला शिळीमकर,ग्राहक संघटना मार्गदर्शक रामानंद पुजारी,राज्य कार्यकारीणी सदस्य व सांगली जिल्हा पालक व सरचिटणीस अनंत खोचरे, विद्या पाटील,साधना पाटील , सरपंच प्रल्हाद पाटील,उपसरपंच तानाजी जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
यावेळी विलासराव पाटील आय.टी .आय.चे प्राचार्य पी .एस.माळी, शिराळा तालुका जागृत ग्राहकराजा संघाचे अध्यक्ष हंबीरराव देशमुख,सरचिटणीस शिवाजीराव चौगुले, सह संघटक जितेंद्र गायकवाड, मोरणा विकास सेवा सोसायटीचे संचालक विजय गराडे,धनटेक वारणा पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष आबासो गावडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, सचिव अशोक चरापले, संजय खामकर,मोरणा दुधचे उपाध्यक्ष विठ्ठल दिवे-पाटील,जयवंत पाटील,बाबासो चौगुले ,मोरणा विकास चे अध्यक्ष जयवंत चौगुले, बाजीराव गंगधर उपस्थित होते.
*******************************************************
शिराळा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्या निवारण करण्यासाठी काय करावे लागले याबद्दल १२ ऑक्टोंबरला शिराळा येथे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ग्राहक गा-हाणे निवारण मंच पुणे परिमंडळ महावितरणचे अध्यक्ष व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रदेशाध्यक्ष मा. अजय भोसरेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्या असणाऱ्या तक्रारीची नोंदणी करण्यासाठी हा गुगल फॉर्म भरावा.त्या नंतर शिराळा येथे आपल्या तक्रारीचा स्व लिखित सविस्तर अर्ज जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्थेच्या शिराळा येथील कार्यालयात ११ ऑक्टोंबर जमा करावा. त्या पूर्वी सविस्तर अर्ज खालील नंबरवरती व्हॉटस् अॅप करावा
संपर्क -9552571493
--------------------------------------------------------------------------शिराळा,ता. २२ :शिराळा येथील एसटी बसस्थानक आवारा समोर शिराळा -इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर असलेल्या .पादचारी मार्गावरील भुयारी मार्गाचा स्ल...
0 Comments