BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या कार्यकर्त्यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश |Joined NCP from BJP

 


शिराळा,ता.२१ :  चिखली (ता. शिराळा) येथे पाचगणी येथील  भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

यावेळी आमदार नाईक म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिराळा मतदार संघात क्रमांक एक वर आहे.बहुतांशी ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, नगरपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा परिषद मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यापुढेही कायम राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. दुसऱ्या टप्प्यातही ते कायम राहणार आहे. निवडणुका लागताच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

 सरपंच शंकर पाटील यांनी स्वागत केले. संदीप पाटील, निवृत्ती पाटील, जगन्नाथ इनामदार, आकाराम चव्हाण, शरद पाटील, खाशाबा पाटील, महादेव पाटील, सचिन इनामदार, शंकर कांबळे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. प्रवेशबद्दल आमदार नाईक  यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी गोविंद पाटील, पांडुरंग पाटील, बाजीराव पाटील, अधिक पाटील, अशोक चव्हाण, निवृत्ती चव्हाण, सिद्धिविनायक चव्हाण, प्रकाश भिंगारदेवे, प्रकाश पाटील, ऋषीकेश खैर, अशोक कांबळे, आकाराम कांबळे उपस्थित होते.

 भाजप मधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अर्ज भरला आणि बिनविरोध सरपंच होणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले.  पाचगणी ग्रामपंचायत निवडणूकीत दीपाली संदीप पाटील यांच्याबाबत हे घडले असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी शुभसंकेत आहेत.

आमदार मानसिंगराव नाईक

Post a Comment

0 Comments