BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जनउत्कर्षचा सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर |Jan Utkarsh announced 9 percent dividend to members



वाकुर्डे खुर्द :  येथे जनउत्कर्ष पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  मनश्री  राजाराम पाटील हिला एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सत्कार करताना संस्थापक विजयसिंह खांडेकर.सोबत संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्षा इंदुताई भाष्टे व इतर 

शिराळा,ता.४ :सभासदांना ९ टक्के लाभांश  देवून संस्थेने सभासदांचे हित कायम जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. सागाव व मांगले येथे संस्थेच्या नवीन दोन शाखांना मंजुरी मिळाली असून गुढीपाडव्या पर्यंत दोन्ही शाखा  कार्यान्वित होतील  असे  प्रतिपादन संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले.

वाकुर्डे खुर्द ता. शिराळा येथे जनउत्कर्ष पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे होते. यावेळी खांडेकर म्हणाले,  पारदर्शक कारभार व नेटके नियोजन यामुळे संस्थेने सभासदांना ९ टक्के लाभांश देवून आजवर १३१ टक्के लाभांशाचा परतावा दिला आहे. स्थापनेपासून संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ मिळाला आहे.  संस्थेची सभासद संख्या १७३६  आहे. सध्या संस्थेच्या वाकुर्डे खुर्द,मांगरूळ ,शेडगेवाडी ,शिराळा अशा चार शाखा असून सागाव व मांगले शाखेस मंजुरी मिळाली आहे. त्या ही लवकरच सुरु होतील. यावेळी स्पर्धा परीक्षेत व शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या सभादांच्या मुलांचा व मनश्री  राजाराम पाटील हिला एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

प्रारंभी अहवाल वाचन विजयसिंग खांडेकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक के, वाय. भाष्टे यांनी केले. कार्यक्रमास सेवा निवृत्त सहायक  पोलीस निरीक्षक सर्जेराव खांडेकर ,मांगरूळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष विश्वास शिंदे ,लेखा परीक्षक आण्णासाहेब जाधव,संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्षा इंदुताई भाष्टे, संचालक शांताराम जाधव, जनार्धन कांबळे,विष्णू सावंत, आनंदराव जाधव,राजाराम मस्के, रघुनाथ धुमाळ,संजय गुरव,शिवाजीराव चौगुले,तानाजी आटूगडे,शोभा पाटील,अशोक लोहार,सुखदेव गुरव, ज्ञानदेव पाटील ,धोंडीराम नांगरे  उपस्थित होते.  


Post a Comment

0 Comments