BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तर राष्ट्र कोसळायला वेळ लागणार नाही-It will not take long for the nation to collapse

 


शिराळा :येथील मारिमी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या थेट भेट अंतर्गत होऊं द्या चर्चा कार्यक्रमाच्या सांगता समारंभ प्रसंगी  बोलताना  नितीन बानूगडे-पाटील सोबत अभिजित पाटील,माजी आमदार उल्हास पाटील ,मुरलीधर जाधव , योजना पाटील व इतर 

शिराळा,ता.१३ : खासगीकरणामुळे ज्ञान मंदिरे  आता मद्य विक्रेत्यांच्या हाती गेल्याने मुलांनी तिथे काय शिकावे.. मुंबई केंद्र शाशित करून अर्थ व्यवस्था खिळखिळी करण्याची खेळी सुरू आहे.शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. सर्वसामान्य माणुस  वेळीच जागा झाला नाही तर संविधान धोक्यात येईल.  देशाचा अर्थाचा कणा असणारा शेतकरी अडचणीत आला तर राष्ट्र कोसळायला  वेळ लागणार नाही असे प्रतीपादन शिवसेनेचे उपनेते नितीन बानूगडे-पाटील  यांनी केले.

येथील मारिमी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या थेट भेट अंतर्गत होऊं द्या चर्चा कार्यक्रमाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी  बानूगडे पाटील म्हणाले , सर्वसामान्याच्या प्रगतीसाठी शिवसैनिक झगडत  आहे. आमचा जाहीरनामा नसतो  तर तो वचननामा असतो.आम्ही कधीच आश्वासन देत नाहीत. हे सरकार  गुलाम तयार करते  की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली  आहे. त्यामुळे हे राज्य कोणासाठी असा  प्रश्न पडला आहे. शेतकरी वर्गास पैसे मिळू नये ,आर्थिक दृष्ट्या ते सक्षम होऊ नये असे प्रयत्न करत आहेत. शासनाने जाहिरातीवर वारे माप पैसे खर्च करण्यापेक्षा औषध , शेतकरी , यांचे साठी खर्च करावेत. खासगीकरणामुळे ज्ञान मंदिरे  आता मद्य विक्रेत्यांच्या हाती गेल्याने मुलांनी तिथे काय शिकावे.. मुंबई केंद्र शाशित करून अर्थ व्यवस्था खिळखिळी करण्याची खेळी सुरू आहे.शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे. सर्वसामान्य माणुस  वेळीच जागा झाला नाही तर संविधान धोक्यात येईल. 

स्वागत व प्रास्ताविकात जिल्ह्ध्यक्ष अभिजित  पाटील म्हणाले,शिराळ्यात शिवसैनिकांची ताकद कमी आली तरी ते एकनिष्ठ आहेत. प्रचंड शक्ती समोर टिकून रहाणे जिकिरीचे असताना ही त्यांनी  आपले अस्तित्व टिकवले  आहे. ठाकरे कुटुंबियांवर येथील लोकांचे प्रेम आहे. या मतदार संघात आमची भूमिका निर्णायक ठरेल. ४५ हजार मतांचा काहीजणांनी बाजार मांडला आहे. ठाकरे कुटुंबियांनी ज्यांच्यावर मुला सारखे व भावासारखे प्रेम केले  त्यांनी अडचणीच्या काळात साथ सोडली. त्यामुळे या लोकसभा मतदार संघावर उद्धव बाळासाहेब यांचा हक्क आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रमुख,मुरलीधर जाधव , माजी आमदार उल्हास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ,

यावेळीजिल्हाध्यक्ष संजय विभूते , संतोष हिरुगडे , पोपट भानुसे ,महादेव मगदूम,स्वप्नील निकम , योजना पाटील, अशोक साळवी , संजय काटे , पराग पाटील ,मधुकर पाटील , सिद्धार्थ जाधव,विनोद आढाव,शकिल सय्यद,उदय सरनोबत,विवेक सांडगे,मानव गवंडी,दिलीप शेखर,संभाजी पाटील,सागर घोलप,कृष्णात पवार,केरबा पाटील,बाबासो खोत,सुनील पाटीलउ पस्थित होते. आभार योजना पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments