शिराळा: चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाच्या विसर्गा मध्ये वाढ करण्यात आली आहे. चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाज्यातुन ५००० क्युसेक व वीजनिर्मिती केंद्रातुन १४००क्युसेक असा एकूण ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदिपात्रात सुरु करण्यात आला आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली असल्याने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारणा धरण अपडेट
वारणा धरणच्या पाणलोट क्षेत्रात निवळी व धनगरवाडा आणि धरण परिसरात ढगफुट्टी सदृश पाऊस झाल्याने ( निवाळी -138 mm, धनगरवाडा-161 mm, धरण परिसर- 89 mm) हा पाऊस साधाराणत दुपारी २.०० वजल्यापासून सुरवात होऊन सायंकाळी ५.०० वा पर्यंत पडला. धारणा मधे 12000 ते 13000 कुसेक एवढा येत आहे. त्यामुळे सद्यस्तीत धरणांतून 6400 कुसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच पाऊसचे प्रमाण वाढल्यास रात्री ८.०० वा विसर्गात वाढ करुन ९५०० कुसेक करण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या लोकानी सतर्क राहावे.
-वारणा धरण व्यवस्थापन
0 Comments