BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन |Inauguration of Customer Service Guidance Center at Shirala

 


शिराळाःग्राहकांच्या शोषणाविरूद्ध आवाज उठवणा-या संघटना कमी  आहेत.ज्या आहेत त्या राजकीय अधिपत्याखाली राहून ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचा तुटपुंजा प्रयत्न करतात.राजकीय हस्तक्षेपामुळे संघटनेचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याचे प्रतिपादन जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्थेचे राज्याध्यक्ष दिलीप फडके यांनी केले.

 शिराळा येथे जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था पुणे संलग्न  जागृत ग्राहकराजा संघटनेच्या  शिराळा येथील "ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रदेश अध्यक्ष न्यायमूर्ती अजय भोसरेकर होते. यावेळी फडके म्हणाले,  शोषित ग्राहकांना योग्य न्याय मिळवून ग्राहकांना जागृत करण्याच्या उद्देशाने ही संघटना आज महाराष्ट्रातील सुमारे १७ जिल्ह्यात कार्यरत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा,तालुका,गावागावामध्ये ग्राहकराजा सेवा मार्गदर्शन केंद्र चालू करण्याचा मानस आहे.

 यावेळी अजय भोसरेकर यांच्या हस्ते  शिराळा येथील ग्राहकराजा ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्राच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.ज्येष्ठ मार्गदर्शक राज्य संघटक दिलीप पाटील,राज्य महिला संघटक शैला शिळीमकर, सातारा जिल्हा अध्यक्ष प्रा.नागनाथ स्वामी,उपाध्यक्ष प्रा.रामानंद पुजारी,सचिव विद्याधर कुलकर्णी, राज्य कार्यकारीणी सदस्य व सांगली जिल्हा पालक अनंत खोचरे ,राज्य कार्यकारीणी सदस्या साधना पाटील, विद्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

         यावेळी   शिराळा तालुका अध्यक्ष हंबीरराव देशमुख,तालुका महिला अध्यक्ष प्रा.सारीका पाटील, तालुका सरचिटणीस.डॉ.शिवाजीराव चौगुले,तालुका संघटक सरोजिनी कदम, संयुक्त चिटणीस रेश्मा पवार, सहकोषाध्यक्ष अनिल पाटील, सहसंघटक रविंद्र यादव, जितेंद्र गायकवाड ,विविध विभाग प्रमुख डॉ.कृष्णा जाधव, शंकरराव जाधव,प्रताप माळी,सुमन माने,संगीता शेटके,विवेक रावते,तानाजी आनेकर,सविता नलवडे, शिवाजी(नाना)चौगुले ,अजय जाधव हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments