शिराळा: शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात मणदूर व मिरुखेवाडी पठार परिसरात रविवारी दुपारी दोन ते साडे चार असा अडीच तास ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढे नाले दुथडी वाहून शेतात गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी बांध वाहून गेले आहेत.
मणदूर. सोनवडे. आरळा तसेच परिसरातील वाड्या-वस्त्याच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले. परिसरात डोंगररांगावर पडलेल्या जोरदार पावसामुळे ओढे, नाले शेत शिवारात वाहू लागले. मणदुर येथील ओढ्याचे पाणी ओढापात्राबाहेर पडुन भातशेतीत घुसले त्यामुळे भातपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
0 Comments