शिराळा,ता.३१: येथील तहसीलदार कार्यालयात कार्यालयीन वेळे अधी तहसीलदार यांच्या दालनात जाऊन दरवाजाला आतून कडी लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र वसंत धस ( वय ३७ , बिळाशी ) यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जिरांगे -पाटील यांना पाठिंबा म्हणून अंगावर डिझेल ओतून घेतल्याने महसूल व पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. तहसीलदार शामला खोत पाटील यांनी धस यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी दरवाजाची कडी काढली.त्यानंतर आत जाऊन तहसीलदार यांनी धस यांच्या हातातील डिझेलचे कॅन काढून घेतल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. तहसीलदार कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम ,पोलीस उपनिरीक्षक जयसिंगराव पाटील,नायब तहसीलदार हसन मुलाणी , गटविकास अधिकारी संतोष राऊत दाखल झाले.त्याच बरोबर शिराळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव , रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सत्यजित कदम , विनोद कदम , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राम पाटील यांनी धाव घेतली.
0 Comments