BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी सैनिक व पोलीस कर्मचारी अजित सपकाळ यांचे निधन |Former soldier and policeman Ajit Sapkal passed away

 


शिराळा,ता.२२: शिवरवाडी ता.शिराळा येथील अजित महादेव सपकाळ वय ५४ यांचे मुबई येथे निधन झाले. त्यांनी  आर्मीमध्ये  २० वर्षे सेवा बजावल्या नंतर दहा वर्षा पासून पोलीस दलामध्ये कार्यरत होते. रबाळे पोलीस ठाणे मुंबई येथे कार्यरत असताना कामावर जाताना  त्यांचा अडीच वर्षापुर्वी मोटारसायकलवरुन पडून अपघात झाला.त्यामध्ये त्यांच्या  डोक्याला गंभीर दुखापत  झाल्याने ते गेली अडीच वर्षे कोमामध्ये होते. आज रविवारी  सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे  निधन झाले.त्यांच्यावर उद्या सोमवार  ता.२३ रोजी सकाळी ७ वा.शासकीय इतमामात शिवरवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,दोन मुलगे,तीन भाऊ असा परीवार आहे. ते शिक्षक व कीर्तनकार अनंत सपकाळ यांचे जेष्ठ बंधू होत.

Post a Comment

0 Comments