शिराळा,ता.२३: शिवरवाडी ता. शिराळा येथील माजी सैनिक व पोलीस कर्मचारी अजित महादेव सपकाळ यांच्यावर आज शासकीय इतमामात शिवरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पोलीस दलाने फैरी झाडून मानवंदना दिली,अजित यांनी सैन्यदलात२० वर्षे, व पोलीस दलात गेले १५ वर्षे सेवा बजावली आहे. रस्ता अपघातामध्ये दुखापत झाल्याने तब्बल अडीच वर्षे ते कोमात होते. वैद्यकीय उपचारा दरम्यान त्यांचा मुंबई येथे मुत्यू झाला. आज सकाळी ७ वाजता त्यांचे पार्थीव शिवरवाडी या त्यांच्या जन्मगावी आणून त्यांच्या पार्थिवाची गावातुन वारकरी सांप्रादायाने टाळ, मुद्रुंगाच्या जयघोषात प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढली. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम तर माजी सैनिक यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य पुर्ननियुक्त संघटनेचे राज्य अध्यक्ष बाजीराव देशमुख, भानूदास बेंदरे, संजय पाळेकर यांचे हस्ते पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. यावेळी अनेकांनी आदरांजली वाहीली.
0 Comments