BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले येथे ग्राहक मार्गदर्शन शिबीर संपन्न | Consumer guidance camp concluded at Mangle

शिराळा,ता.१३: मन,बुद्धी,आत्मा असतो तो ग्राहक असतो. ग्राहकाची व्याप्ती मोठी आहे. प्रबोधन, संघटन,रचनात्मक काम हे महत्वाचे आहे. ज्याने देह धारण केला तो ग्राहक असतो . त्यामुळे त्यास होणाऱ्या  मानसिक त्रासाचे मूल्य जाणणारा हा ग्राहक संरक्षण कायदा आहे. त्याचा वापर योग्य पद्धतीने करायला शिकला तरच तुम्हाला न्याय मिळेल असे प्रतिपादन   ग्राहक गा-हाणे  निवारण मंच. व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अजय भोसरेकर यांनी केले.

मांगले.(ता.शिराळा) येथे मोरणा उद्योग समूहा व शिराळा तालुका जागृत ग्राहकराजा संस्थेच्या वतीने मोरणा उद्योग समूहाचे  संस्थापक स्व.विलासराव पाटील यांच्या  तृतीय व मोरणा उद्योग समूहाचे  माजी अध्यक्ष  स्व.नवीनकुमार विलासराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने  विलासराव पाटील धनटेक पाणी पुरवठा संस्था सभागृहात  ग्राहक मार्गदर्शन शिबीर व  विलासराव पाटील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या  विध्यार्थ्यांच्या   पदवीदान समारंभ प्रसंगी बोलत होते.  अध्यक्षस्थानी मोरणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष सत्यजित पाटील होते.

 ग्राहक तक्रार निवारण मंच,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ.बारामती,कोल्हापूर, रत्नागिरी परिमंडळचे श्रीकांत बाविस्कर म्हणाले, ग्राहकांनी आपले गाऱ्हाने सल्ला घेऊन स्वतः मांडवीत. त्यासाठी जागृती महत्वाची आहे.ग्राहक जागृत नसल्याने दिवसेंदिवस फसवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्ही जागृत झाला तरच तुमची फसवणूक टळेल .

जागृत ग्राहकराजा संस्थे राज्याध्यक्ष  दिलीप फडके म्हणाले, मोफत मिळणाऱ्या शासकीय सोई सुविधावर आपण  विश्वास ठेवला पाहिजे. भ्रष्टाचाराची खरी सुरुवात आपल्या पासून  होते. समोरच्याला देतो म्हणून तो घेतो.

स्वागत व प्रास्ताविक सारिका पाटील यांनी तर सूत्रसंचलन विजय गराडे यांनी केले. 

यावेळी अनंत खोचरे, दिलीप पाटील,रामानंद पुजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास  शैला शिळीमकर, प्रा.नागनाथ स्वामी,अमरनाथ शेणेकर, माजी उपसभापती सुभाष पाटील,उपसरपंच तानाजी जमदाडे, रणजितसिंह नाईक, प्रा.वसंत शिंघण,वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, विद्याताई पाटील, लादेवाडी सरपंच वैशाली खोत, सविता नलवडे, शिराळा तालुका जागृत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष हंबीरराव देशमुख, हरिभाऊ खापरे,शिवाजीराव चौगुले, जितेंद्र गायकवाड, मनोज मस्के  उपस्थित होते.आभार प्राचार्य पी.एस.माळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments