शिराळा:शिराळा पंचायत समिती आवारात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांनी उभारलेल्या स्टॉल्सची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व इतर
शिराळा,ता.२३ : शिराळा पंचायत समिती आवारात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांनी उभारलेल्या स्टॉल्सची पाहणी व त्यांच्या उत्पादनांची माहिती सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) शशिकांत शिंदे व कार्यकारी अभियंता (लपा विभाग) संतोष कुंभार,व गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी ,राजगिरा लाडू,तांदूळ,वेपर्स चटणी मसाले,धूप,कपूर,अगरबत्ती ,गांडूळ खत ,सेंद्रिय गुळ,चप्पल अशा विविध उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता पाहून धोडमिसे यांनी त्यांचे कुतुक केले.यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक शिवाजी खरात,व्यवस्थापक अक्षय कचरे,प्रभाग समन्वयक बसवराज व्हनगंडी,प्रवीण कुंभार,शुभांगी पाटील,कौशल्य समन्वयक सुवर्णा चव्हाण, आशा सावंत,नंदा सावंत,अस्मिता शेळके, सविता पाटील, अश्विनी पाटील,सुप्रिया पाटील, संगीता सावंत,स्वाती पावले,सारिका पाटील,सुमन माने,वर्षा गायकवाड,पूनम ढोले,स्वाती लबडे,उज्वला पाटील,शीतल कुंभार,गीतांजली पाटील या बचत गटाच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
0 Comments