BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आनंदराव नाईक शिराळा तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील कवठेकर तर उपाध्यक्षपदी सदाशिव भंडारे बिनविरोध |Anandrao Naik Shirala Taluka Credit Union President Sunil Kavathekar and Vice President Sadashiv Bhandare unopposed

 



शिराळा,ता.२८ :चिखली ( ता.शिराळा ) येथील आनंदराव नाईक शिराळा तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील कवठेकर तर उपाध्यक्षपदी सदाशिव भंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

   या संस्थेची संचालक मंडळ निवडणूक आमदार मानसिंगराव नाईक , विराज ग्रुप चे अध्यक्ष विराज नाईक , माजी सभापती सम्राटसिंह नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली.यामध्ये  सुनील कवठेकर , सदाशिव भंडारे ,  डॉ.अजय पाटील , सचिन शेटे , सुभाष करांडे ,  बाबासाहेब चौगुले , नामदेव शेणवी , शीतल पाटील , दीपाली चौगुले , दीपक तडाखे , सुनील तांदळे यांची बिनविरोध निवड झाली होती. अध्यक्षपदी कवठेकर  उपाध्यक्षपदी भंडारे यांची निवड झाली. 

  ही निवडणूक निर्णय अधिकारी सौ. यु.एस. वाटेगावकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी प्रमोद नाईक , बसवेश्वर शेटे , राजेंद्र निकम , अजय जाधव , काका कवठेकर , तानाजी कुरणे , रामचंद्र चौगुले, आगाशिव बिऊरकर , दादासाहेब पाटील , राजाराम माने , आकाराम खोत , विजय चौगुले आदी उपस्थित होते. या निवडीनंतर पदाधिकारी , संचालक मंडळाने लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments