शिराळा,ता.२२: जिल्हा कारागृह पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद ) येथून शिक्षा भोगत असताना पळून आलेल्या पाडळीवाडी (ता.शिराळा) येथील रामचंद्र रघुनाथ पाटील (वय ४३ ) यास शिराळा पोलिसांनी अटक करून त्यास पैठण पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत माहिती अशी की , २६ ऑगस्ट २००९ मध्ये शिरशी येथील चंदर बापू महिंद यांच्या खुनाच्या आरोपात रामचंद्र पाटील यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगत असताना मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथुन कायमस्वरुपी वर्ग होवुन उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी त्यास २४ नोव्हेंबर २०१८ रोजी खुले जिल्हा कारागृह पैठण येथे पाठवण्यात आले होते.. पैठण येथील बंदी कायदेशीर रखवालीत शिक्षा भोगत असताना १ मार्च २०२३ रोजी दुपारी दोनच्या दरम्यान तो कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला होता. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, शशिकांत लुगडे, संदीप पाटील, कालिदास गावडे,अमोल साठे, नितीन यादव, सतीश पाटील यांनी गुप्त बातमीदारमार्फत या बातमी काढुन त्याच्या राहते गावातुन साफळा रचून ताब्यात घेतले.त्यास पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस अमंलदार यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी दिले आहे.
0 Comments