चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना व विराज कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना आमदार मानसिंगराव नाईक व आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक
शिराळा,ता.२८: चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना व विराज कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेत कणदूरच्या सुभाष गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. द्वितीय क्रमांक रेड येथील मानसिंग चव्हाण, तृतीय क्रमांक मांगलेच्या शिवाजी पाटील, चतुर्थ क्रमांक शिराळाच्या मनोज काटकर व पाचवा क्रमांक बिऊरच्या शामराव जाधव यांना मिळाला. त्यांना पाच, चार, तीन, दोन, एक हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, भेटवस्तू व सन्मानपत्र देण्यात आले. शिराळे खुर्दचे गणेश काळे, पाचुंब्रीचे विकास पाटील, शिराळाचे दादासो नलवडे व कणदूरचे नानासो आतकीरे, भेडसगावचे दीपक पाटील यांनी उत्तेजनार्थ रोख रक्कम , स्मृतीचिन्ह, भेटवस्तू व सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील, कामगार संचालक दतात्रय पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संघटना उपाध्यक्ष विजय पाटील ,सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments