BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यशवंत ग्लुकोज वार्षिक सभा



शिराळा,ता.२७:यशवंत सहकारी ग्लुकोज कारखाना नजीकच्या काळात मक्यापासून आणखी तीन नवीन उत्पादने घेत गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढिवण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

शिराळा येथील रसिका मल्टिपर्पज हॉल मध्ये यशवंत ग्लुकोज कारखान्याची २८ वी वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, यशवंत उद्योग समूहातील सर्व संस्था आता नव्या जोमाने सुरू आहेत. नजीकच्या काळात शिवाजी केन प्रोसेसर्स देखील सुरू होईल. शेतकऱ्यांनी मका लागवड करून त्यांचे पीक घेण्यावर भर द्यावा.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, संस्था चालवत असताना राजकारण बाजूला ठेवावे, पुढील काळात यशवंत ग्लुकोज कारखाना मोठ्या प्रमाणात मक्यापासून विविध प्रकारच्या पदार्थांची निर्मिती करेल. नियमात राहून कारखान्याला मदत केली आहे. यापुढे देखील करत राहू.

 रणधीर नाईक म्हणाले, कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. मक्यापासून ग्लुकोज, स्टार्च यासरख्या पदार्थांबरोबर आता नव्याने माल्टोज डेस्टीन पावडर, माल्टोज सिरप, आणि हाय माल्टोज सिरप या पदार्थांची निर्मिती सुरू करणार आहोत. कारखाना बंद असलेल्या कालावधीत लाभांश देता आलेला नाही. मात्र येत्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लाभांश वाटप करण्यात येईल.

 सहेली मुलाणीच्या पसायदानाने सभेला सूरवात झाली. श्रद्धांजली ठराव संचालक शहाजी पाटील यांनी मांडला. स्वागत सुखदेव पाटील यांनी केले. मान्यवरांचा आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसह गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी उपाध्यक्ष आनंदराव पाटील, कार्यकारी संचालक अभिजित नाईक,युवराज पाटील,प्रल्हाद पाटील,बाळासाहेब पाटील,विजय पाटील,एन.डी.लोहार,एम.एस.कुंभार,सुधीर बाबर,गजानन घोडे पाटील,रघुनाथ पाटील,एम. के जाधव,सी.एच. पाटील, नगरसेवक उत्तम डांगे, वैभव गायकवाड, सचिन यादव, गुंडा पवार, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, जे. बी. पाटील, शिवाजी नांगरे, दिलीप कदम, कुंदाताई पाटील या मान्यवरांच्या सह सभासद, शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार राजन पाटील यांनी मानले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments