शिराळा,ता.२६: जमिनीवर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरतो. तो पाऊस रूपाने पुन्हा बरसण्यासाठी हजारो वर्षापासून चालत आलेले हे निसर्गचक्र अव्याहतपणे आजही सुरू आहे. परंतु अलीकडच्या काळात पावसाने ओढ दिल्याने हाता तोंडाशी आलेली पिके वाळून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याकरिता कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे मत मंडळ कृषी अधिकारी सुभाष घागरे यांनी व्यक्त केले..
तडवळे (ता.शिराळा) येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि गुरुवर्य एस. एच.पाटील विद्यालय तडवळे आणि ग्रामपंचायत तडवळे यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या शुभारंभ प्रसंगी होल्त होते. यावेळी वनराई बंधारा बांधण्यात आला.या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील भात, सोयाबीन, भुईमूग या वाळत चाललेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. यावेळी कृषी पर्यवेक्षक जे .के. खोत, कृषी सहायक शंभूराजे भोसले,सरपंच प्रियांका पाटील, माजी सरपंच अमृत पाटील,नानासो पाटील, गजानन पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक हिंदुराव ताटे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments