शिराळा,ता.१३: काॅग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेचे शिराळा तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत,काॅग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पदयात्रे दरम्यान शेतकरी,कामगार, कष्टकरी,महिला,मुले यांचाशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
कॉंग्रेस जनसंवाद पदयात्रेची सुरूवात चरण येथे स्वातंत्र्य सैनिक बाबुराव दादा चरणकर यांच्या प्रतिमेला काॅग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून करण्यात आली. ही पदयात्रा मोहरे, नाठवडे गावातून शेडगेवाडी पर्यंत पाच किलोमीटर काढण्यात आली. त्या ठिकाणी काॅग्रेस जनसंवाद यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, आज महाराष्ट्रात जाती पातीचे राजकारण करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. महागाई गगनाला भिडली आहे.भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचन नाम्या पैकी कोणते काम केली आहेत याचा विचार करावा .बेरोजगारांना काम देवू , महागाई कमी करू अशी अनेक आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे.
काॅग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले,देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान आहे. कॉंग्रेसच्या काळात तालुक्यात अनेक विकासकामे झालेली आहेत.तालुक्यात काॅग्रेसवर प्रेम करणारी लोकं आहेत.तालुक्यात काॅग्रेस वाढवण्यासाठी जी मदत पाहिजे ती मदत जिल्ह्यातून दिली जाईल.
यावेळी कॉंग्रेसचे युवक नेते जितेश कदम, शिराळा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड रवी पाटील, प्रा.कादर नायकवडी, राजाभाऊ चरणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळीउपाध्यक्ष पोपट कदम, शिराळा विधानसभा युवक अध्यक्ष रविंद्र कोकाटे, आनंदराव पाटील , शंकर नायकवडी, संजय नायकवडी,सर्जेराव कोकाटे,सुनिल घोलप,वैभव वाघमारे, राहुल चरापले ,विकास पाटील,आरिफ हवालदार,रामचंद्र नाईक,विकास साळुंखे,अमित पारेकर,नंदकुमार शेळके, सागावच्या सरपंच अस्मिता पाटील,सचिन पाटील,जयदीप पाटील यांच्या सह तालुका काॅग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments