BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कहाणी नृत्यांगना गौतमी पाटीलची | The story of dancer Gautami Patil | डान्सर गौतमी |Dancer Gautami

 



खेडोपाडी आणि शहरवासीयांच्या मनावर समाज मध्यम व प्रत्यक्ष व्यासपीठावरून  आदिराज्य गाजवून  गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपल्या अदाकारीने सर्वाना घायाळ करणारी प्रसिद्ध  नृत्यांगना गौतमी पाटील ही मुळची धुळे जिल्ह्यातील सिंदखेडाची. खेड्यातील मुलगी पुण्यात आली .पुण्यात आपण जाईल  याचा विचार ही तिच्या मनात कधी आला नव्हता . पुण्यात येवून आपल्या बाबत असं काही घडेल  याचा तिला अंदाज नव्हता. तिचे  जगण्यासाठी दोन घास मिळावेत या पलीकडे कोणतेही  मोठे स्वप्न नव्हते. पण पुढे ती  परिस्थिती नुसार ती बदलत गेली आणि मराठी मुलगी गौतमी पाटील फेमस  झाली. तिचा हा प्रसिद्धीचा झोत सर्वाना दिसतो. पण तिच्या या मागील  अनेक यातना कोणाला माहित नाहीत. हा तिचा संपूर्ण आता पर्यंतचा जीवन प्रवास तिने एका  वाहिनीवर मुलाखती दरम्यान  व्यक्त केला आहे.   

 तिचं बालपण आईच्या माहेरी म्हणजे तिच्या आजोळी  सिंदखेडामध्ये गेले. तिच्या वडिलांचे गाव हे चोपडा आहे. आजोळी तीचे आजोबा ,दोन मामा, मावशी त्यांची मुल असे कुटुंब  आहेत. आजीचे निधन झाले असल्याने तिचा सांभाळ आई आणि आजोबांनी केला आहे. मामा पुण्यात रहायला आहेत. तीचे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे.ती आठवी  पर्यंत गर्ल्स हायस्कूल सिंदखेडा येथे शिकत होती. त्यानंतर गौतमीच्या आईच्या व तिच्या भविष्याचा विचार करून तिच्या वडिलांना  पुण्यात  आणण्याचा  निर्णय तिच्या मामांनी व आजोबांनी  घेतला. तिच्या मामांनी त्यांना पुण्यात भारती विद्यापीठ येथे खोली घेवून दिली. पुण्यात दहावी पर्यंत शिक्षण घेतले. गौतमी पोटात असताना तिची आई तिच्या वडिलांच्या पासून विभक्त  होती. गौतमी आठवीत असताना तिने  वडीलांना प्रथम पहिले. तिच्या वडिलांनी ही तिला पहिले नव्हते. त्यांचा तो पर्यंत कधी संपर्क हीआला नाही. त्यांनी कधी एकमेकांना फोटोत सुद्धा पाहिले नाही.  त्यांच्या विभक्त राहण्याची कारणे तिच्या आईने तिला सांगितली नव्हती. पण ती पुण्यात गेल्यानंतर वडील कायम दारू पित असल्याचे कारण तिला समजले. पुण्यात आल्या नंतर तिच्या वडिलांना तिच्या मामांनी नोकरी शोधून दिली. पण व्यसनाधीन असल्याने ते जास्त काळ कुठेच नोकरी करू शकले नाहीत. त्यांना गावालाच जायचं होत .तिची आई छोटी छोटी काम करून उदरनिर्वाह करत होती. ती पुण्याच्या धायरी येथील बंडोजी खंडोजी शाळेत शिकत होती. गावचे व शहरातील शिक्षण यात फरक असतो.तो तिला पुण्यात आल्या नंतर जाणवला. तिच्याशी जास्त कोणी मैत्री करत नव्हते.तिला फक्त एकच मैत्रीण होती. तिला गावाकडे सण उत्साहात साजरे करण्याची आवड होती. जास्त मैत्रिणी ही होत्या. अभ्यासा पेक्षा तिला नृत्याची ची खूप आवड होती. गॅदरिंग म्हणजे तिच्यासाठी मोठा सणाचा दिवस असायचा. गाण्यात नाचण्यासाठी पुढे घेतले नाही तर ती रडायची. आईकडे ही तक्रार करायची  तिने मागील रांगेत मध्ये  राहून सहावी सातवीत असताना  चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर पहिल्यादा नृत्य केले.व्यसनाची सवय अधिक जडल्यायाने तीचे वडील  पुण्यातून गावी घरी गेले. त्यानंतर  आई व गौतमी दोघीच पुण्यात होत्या. त्यांतर आईचा अपघात झाला.  ती घरीच असल्याने  खर्चासाठी  त्यांच्याकडे पैसे नसल्याने तिच्या आईने मंगळसूत्र गहाण  ठेवून आपला चरितार्थ सुरु ठेवला. गौतमीला नृत्याची  आवड असल्याने तिच्या आईने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्या नंतर तिच्या आईंच्या मैत्रिणीने तिच्या ओळखीने लावणी शिकवणारे महेंद्र बनसोडे यांची भेट घालून दिली. त्याठिकाणी तिने नृत्याचे शिक्षण घेतले. त्यावेळी प्रत्येकानं घुंगरू आणण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी ते आणण्यासाठी गौतमी कडे ५०० रुपये ही नव्हते. इकडे तिकडे गोळा करून ते आणले. तिने अकलूज ला असणाऱ्या लावणी मोहत्सवात पहिल्यांदा लावणी सादर केली. त्यांच्या ग्रुपचा पहिला क्रमांक आला. त्यावेळी तिला स्वतःला मेकअप ही करता येत नव्हता. त्यानंतर तिने अनेक ग्रुप सोबत कार्यक्रम केले. साधारण सहा वर्षापूर्वी तिने वाघोली येथे तिने स्वतःचा लावणीचा कार्यक्रम केला. त्यानंतर तिला काही प्रमाणात कार्यक्रम मिळू लागले. त्यावेळी पहिल्यांदा  मिळालेल्या पाच ह्जारातून  आईने गहाण ठेवलेले  मंगळसूत्र तिने  सोडविले. गौतमी आपल्याला मिळालेल्या यशाचे पहिले श्रेय वडिलांना देते. ती म्हणते  त्यांनी ही परिस्थती आमच्यावर आणली नसती  तर मी या नृत्य क्षेत्रा आलेचं  नसते. कारण मला हवं ते वडिलांच्या कडून मिळत गेले असते तर मला नृत्याला वावच मिळाला नसता. त्यां नंतर जीणे आपल्याला खंबीर साथ दिली त्या  आईला श्रेय देते. 

माझ्या कार्यक्रमावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कारणा वरून  कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवात  दोन ठिकाणच्या कार्यक्रमावर बंदी आणली. पण मी गौतमी पाटील एकटीच नाही. माझ्या सोबत आमचा २५ जणांचा ग्रुप आहे. त्यांचे ही कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना  त्यांचा ही विचार करायला हवा  होता. सण उत्सव हे आमच्यासाठी उत्पन्नाचं साधन आहे .

गौतमीच्या धीरगंभीर आठवणी 

गौतमी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ सर्वत्र समाज माध्यमावर पसरला. त्यावेळी ती घरात होती. हे तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले.त्यावेळी तिला मोठा धक्का बसला .तिच्या मनावर मोठा आघात झाला. त्यावेळी तिला वाटलं आता आपलं भविष्य संपलं .आपण थांबवं. लोकांना आपली प्रगती बघवत नाही. त्यामुळे आपल्या बाबतीत हे असे घडत आहे. त्यावेळी तिच्या मनात एक विचार आला. या गोष्टी मुळे मी थांबले तर ज्यांना मी नको त्यांच्या मनासारखे होईल. त्यामुळे आलेल्या संकटाला सामोरे जात पुन्हा नव्याने जोमाने कार्यक्रम सुरु केले.समोरून कसा प्रतिसाद मिळतोय याची भीती ही मनात होतीच .पण लोकांनी मला चांगली कलाकार म्हणून भरभरून प्रतिसाद दिला. यात महिलांची मोठी साथ मिळाली. त्यांच्या या मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाने मी नेटाने उभी राहिली.  कधी कधी वाटतं तिला वाटत ती  गरीब घराण्यातील आहे, म्हणून तिच्यावर  टीका केली जाते. तिला  कुणाचा पाठिंबा नाही, तिच्या सोबतीला  कुणाचा हात नाही म्हणून या गोष्टींना तिला सामोरं जावं लागतं.ज्यावेळी तिच्या कडून  चूक झाली त्यावेळी तिने  माफी मागितली होती. आता व्यवस्थित करते तरीही तिच्यावर टीका  होतंय. तिच्या सारखे अनेक कलाकार चित्रपटात गेले आहेत. पण त्यांच्यावर  कोणीच बोलत  नाही. ज्यावेळी तिच्यावर  कुणी टीका केली त्यावेळी ती  शांत राहण्याचा प्रयत्न करते. मला राजकारण समजत नाही. मला आयोजक ज्या गाण्यावर नृत्य  करायला सांगतात त्यावर मी करते,कारण त्यांच्या कडून मी पैसे घेतलेला असतात. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करावी लागते. अजून  तरी गौतमीने  तिच्या लग्नाचा विचार केलेला नाही. तिच्या लग्ना बद्दल घरात चर्चा होते. तिला  अनेकांकडून लग्नासाठी मागणी घातली जातेय. पण तिच्याशी लग्न करणाऱ्या मुलाने तिच्या  सोबत जे काही झालंय ते स्वीकारावं आणि तिच्या आईला ही संभाळल पाहिजे ही तिची अपेक्षा आहे.  एक मुलगा तर कार्यक्रमाच्या ठिकाणीच तिला मागणी घालण्यासाठी आला होता. तसं तो मुलगा  तिच्या मॅनेंजरशी लग्नाच्या मागणी बद्दल बोलून गेला. गौतमी म्हणते, 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वडिलांचा मृत्यू ४ सप्टेंबर २०२३ ला झाला. गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती. गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.धुळ्यातील दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील हे बेवारसपणे पडलेले आढळून आले होते. सुरुवातीला ते कोण आहेत, याची त्यांना जाणीव नव्हती. त्यांनी रविंद्र पाटील यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या खिशातील आधार कार्डमुळे त्याचं नाव कळालं. चव्हाण यांनी सोशल मीडियात त्यांच्याबद्दल माहिती टाकली. त्यानंतर ते गौतमीचे वडील असल्याचं लक्षात आलं होतं.

Post a Comment

0 Comments