शिराळा : गौरी गणपती सजावट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सरोजनी कदम यांना बक्षीस वितरण करताना आपला बझारच्या अध्यक्षा सुनितादेवी नाईक सोबत साधना पाटील ,दिपाली नाईक, अंकिता नाईक, मृणाल नाईक, सुनिता निकम ,प्रतिभा पवार, वैशाली कदम.
शिराळा,ता.२९ : शिराळा तालुका राष्ट्रीवादी कॉंग्रेस पार्टी व शिराळा सखी मंच यांच्यावतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत सरोजनी कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना आपला बझारच्या अध्यक्षा सुनितादेवी नाईक यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले.
सरोजनी कदम यांनी आपल्या घरातील गौरी गणपतीची सजावटीसाठी १२० वर्षा पूर्वी पासूनचे संग्रही असणारे ५४ पौराणिक ग्रंथ, वतर्मानपत्राचे गोळे,ब्रम्हांड ,आंब्याची पाने,गुलाबाची फुले व फांद्या , चाफ्याची पाने आणि फुले, कापसाची रांगोळी, काश्य व पितळेची भांडी,यांचा वापर करून एको फ्रेंडली सजावट केली होती. द्वितीय क्रमांक नीलम काटकर, तृतीय क्रमांक रेखा मुळीक ,चतुर्थ क्रमांक ज्योती खुर्द व वैशाली कानुंजे ,पाचवा क्रमांक मंगल पांगे,उतेजानार्थ दिपाली पाटील. या सर्व विजेत्यांना आपला बझारच्या अध्यक्षा सुनितादेवी नाईक यांच्या हस्ते बक्षीस देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमास महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, दिपाली नाईक, अंकिता नाईक, मृणाल नाईक, सुनिता निकम ,प्रतिभा पवार, सखी मंचच्या अध्यक्ष वैशाली कदम, वर्षा पाटील, अर्चना कदम, कल्पना गायकवाड, वंदना यादव, विजया माने, वैशाली भुयेकर उपस्थित होत्या.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments