BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माहिती अधिकार अधिक सक्षम झाला पाहिजे |Right to Information should be strengthened



शिराळा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अॅड. रवी पाटील सोबत बाळासाहेब पाटील ,डॉ. प्रवीण पाटील,डॉ. सतीश जाधव, सतीश नवले, अनंत खोचरे ,हंबीरराव देशमुख, रवी पाटील,मारुती रोकडे व इतर 

शिराळा,ता.२८ :माहिती अधिकार कायदा अधिक सक्षम झाला पाहिजे.गावचे पुढारीच ठेकेदार बनल्याने गावच्या कामांचा दर्जा रहात नाही. त्यामुळे  शासनाच्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचे  प्रतिपादन अॅड रवी पाटील यांनी केले.

शिराळा पंचायत समितीच्या सभागृहात  शिराळा पंचायत समिती व शिराळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता कृती समिती यांच्या वतीने  माहिती अधिकार दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते. यावेळी पाटील म्हणाले, माहिती अधिकार ही चळवळ आहे. या अधिकारामुळे शासकीय कामात पारदर्शकपणा येऊ लागला आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, माहिती अधिकार हे शस्त्र आहे.त्याचा न्यायिक मागणीसाठीच उपयोग करावा. महिला सरपंचानी कोणाच्या दबावाला बळी न पडता योग्य मार्गाने कारभार करावा. आपल्यामुळे आपण व दुसरा अडचणीत येणार नाही याची दक्षता घ्यावी.समाजभिमुख कारभार करावा. विनाकारण कोणाला तरी त्रास देण्याच्या हेतूने माहिती  अधिकाराचा वापर करू नये आणि कोणाचा अन्याय ही सहन करू नये..

स्वागत व प्रास्ताविक कृषी अधिकारी धनंजय थोरात यांनी केले.यावेळी हंबीरराव देशमुख, रवी पाटील, अनंत खोचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमास  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील,डॉ. सतीश जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले,अधीक्षक प्रदीप महामुनी, कृषी विस्तार अधिकारी नाना कारंडे, विजय पाटील ,आरोग्य विस्तार अधिकारी संजय चौगुले,शरद नायकवडी,रवी पाटील,मारुती रोकडे,शिवाजीराव चौगुले,दिग्विजय पाटील, रवी यादव, जितेंद्र गायकवाड,अमोल काटकर, तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,सदस्य उपस्थित होते.आभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस.डी.सातवेकर यांनी मानले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments