शिराळा,ता.२५ :शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व गुढे चे माजी सरपंच सखाराम दुर्गे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
शिराळा बाजार समितीची निवडणूक पाच महिन्या पूर्वी एप्रिल महिन्यात बिनविरोध झाली होती.त्यामध्ये राष्ट्रवादी १४ व भाजप ४ संचालक असे पक्षीय बलाबल असल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सखाराम दुर्गे हे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांना बाजार समितीच्या संचालकाची संधी दिली. मात्र बदलत्या राजकीय घडामोडीत नुसार दुर्गे यांनी सहाजिकच शिवाजीराव नाईक यांच्या समवेत राष्ट्रीवादी न रहाता त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा बाजार समितीच्या सचिवांच्या कडे पाठविला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत तो मंजूर करून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे आता बाजार समितीत १७ संचालक राहिले आहेत. दुर्गे यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे. कारण दुर्गे हे गुढे येथील असून त्यांना गुढे पाचगणी पठारावरील शिवाजीराव नाईक यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून कामाची संधी संधी दिली होती. आता त्यांनीच दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने त्यांची जागा रिक्त झाल्याने याच पठारावरील दुसऱ्या कोणत्या कार्यकर्त्याला संधी मिळणार याची चर्चा सुरु आहेत. ही संधी देताना शिवाजीराव नाईक यांच्या कि मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्याचा विचार केला जाणार याची ही राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
मी राष्ट्रवादीतून शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून संचालक झालो होतो.त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
सखाराम दुर्गे संचालक शिराळा बाजार समिती
संचालक सखाराम दुर्गे यांचा राजीनामा बाजार समितीस प्राप्त झाला असून तो संचालक मंडळाच्या बैठकीत मजूर केला आहे. तशी माहिती जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठवली आहे.
एच.एम.पाटील सचिव बाजार समिती
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments