BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अविनाश कुरणे या युवकाचे मरणोत्तर नेत्र व त्वचा दान |Posthumously eye and skin donation of Avinash Kurane



 शिराळा : येथील अविनाश कुरणे या युवकाच्या मरणोत्तर  नेत्रदान व त्वचा दानना नंतर त्यांच्या कुटुंबियांना प्रमाणपत्र वाटप करताना सविता नलवडे व इतर 

शिराळा,ता.२०:शिराळा शहरातील अविनाश संभाजी कुरणे या युवकाचे वयाच्या  २६ व्या वर्षी निधन झाले. आपल्या मुलाचे ऐन तारुण्यात निधन झाल्याने कुरणे कुटुंबियाच्या वर मोठा आघात झाला. हे दुःख पचवत कुरणे कुटुंबीयांनी त्याच्या नेत्र व त्वचा दानाचा धाडशी निर्णय घेवून त्याच्या स्मृती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तालुक्यातील हे पहिले त्वचा व नेत्रदान ठरले आहे. 

अविनाशच्यामुळे दोन रुग्णांना दृष्टी तर मिळणारच आहे पण त्याच्या त्वचा दानामुळे  अनेकांचे जीव वाचणार आहेत.    यासाठी  नेत्र चिकित्सा अधिकारी सविता नलवडे, प्रहार संघटनेचे  बंटी नांगरे यांचे सहकार्य लाभले. नेत्रदान हे सांगलीच्या श्री टेके आय क्लीनिक व हॉस्पिटल यांच्या आय बँकेने स्वीकारले. डॉ. निकीत व सहाय्यक गंगने यांनी प्रमाणपत्र  कुरणे कुटुंबाला देवून अविनाश याच्या समृतीस  अभिवादन केले.सांगलीच्या रोटरी स्किन बँक यांनी त्वचा  स्वीकारली. डॉ. स्मरणिका दुबल, डॉ. हेमा चौधरी यांनी व त्यांच्या सर्वं कर्मचाऱ्यांनी  सहकार्य केले. नेत्र व त्वचा दानसाठी अक्षय कुरणे यांनी संमती दिली. यासाठी ग्रामीण रुग्णालय शिराळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कणसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुबेर मोमीन, बजरंग कुरणे,राजीव नलावडे,राहूल पाटील,अभिजित कुरणे, संतोष कुरणे, मधुकर कुरणे, अशोक कुरणे,यांनी मोलाचे सहकार्य  केले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments