BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रीय बहुजन कामगा महासंघाच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन |One day dharna movement on behalf of Rashtriya Bahujan Kamaga Federation

शिराळा ,ता.१५:मागण्या बाबत साकारात्मक निर्णय न झाल्यास  सहाय्यक कामगार आयुक्त सांगली येथे हजारो  कामगार घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष  संदीप पाटोळे, प्रदेशाध्यक्ष निलेश दाभाडे यांनी दिला आहे. .

आपल्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय बहुजन कामगा महासंघाच्यावतीने शिराळा  तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रीय बहुजन कामगा महासंघाच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन तहसीलदार शामला खोत पाटील यांना देण्यात आले.यावेळी  कामगारांना दीपावलीचा बोनस दहा हजार द्यावा, मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती, विधवा महिलांन मिळणारी पेन्शन, अंत्यविधीसाठी मिळणारे दहा हजार  व  ५१  वर्षा  पुढील वारसास मिळणारे दोन लाख, नवीन नोंदणी व चुकीच्या त्रुटी काढून, अपडेट केलेले नोंदणी, शिष्यवृत्ती व सर्वच लाभाचे अर्ज व घरकुले अनेक महिन्यापासून प्रलंबित असून ते लवकरात लवकर निकालात काढण्यात यावे, मध्यान भोजन अतिशय निकृष्ट दर्जा असून वेळेत मिळत नाही. गुळ, लोणचे, मिरची कमी प्रमाणात मिळते. काहीना मिळतच नाही. काही वेळ जेवण अमलेले असते. ह्या योजनेचे प्रशासनाचे लक्ष नसल्याने या योजनेत मोठा भ्रष्टाचार होत आहे. तो थांबून या योजनेची चौकशीकरावी . कामगार व त्याच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी साठी थेट ५०००  द्यावे . विधवा महिला व परीतक्ता  ह्यांना पाच वर्ष पेन्शन दिली जाते ती दहा वर्षे द्यावी. नागरिकांना अचानक मिळणारे रेशन धान्य बंद झाले आहे.त्याची चौकशी करून पुन्हा धान्य मिळावे. संजय गांधी निराधार पेन्शन ज्या महिलांना मिळते. ती पेन्शन मुले १८ वर्षाची झाल्या नंतर बंद केली जाते. खऱ्या अर्थाने या महिलेला पेन्शनची गरज असते. ती पेंशन महिलेच्या मुलांच्या वयाच्या २५  व्या वर्षापर्यंत करण्यात यावी. अपंग महिला व पुरुष यांना घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण माफ करून त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष  संदीप पाटोळे, प्रदेशाध्यक्ष निलेश दाभाडे, प्रवक्ते एन.डी,पाटील,सचिन बोणे ,सचिन शेडगे ,मनोज सव्वाखंडे ,रमेश पाटील, संभाजी शिंदे,सुरेखा शेडगे,रुपाली शेडगे,पूनम पाटील,अनुष्का मुंडे,छाया लोहार,शैला दिवे  उपस्थित होते.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments