बिळाशी, ता.२९: येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी 'राष्ट्रवादी' चे विजय कृष्णा रोकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच सुवर्णा साळुंखे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. उपसरपंच पदासाठी रोकडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची सर्वांनुमते निवड झाली. सन २०२१ साली ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँगेस, काँग्रेस (सध्याच्या भाजपा गटाचे ) मिळून ११ उमेदवार निवडून आले होते.
सरपंच देशमानेंंच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद खोत यांनी काम पाहिले. माजी उपसभापती आनंदराव पाटील, 'प्रचिती' दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. पाटील, विश्वास पाटील, माजी सरपंच कल्पना यमगर, अमित यमगर, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यानंतर जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.
0 Comments