शिराळा : येथे प्रचिती सांस्कृतिक मंच, सखी मंच शिराळा व लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट मार्फत जागर मंगळागौरीचा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. १८ ते ३५ वयोगटात महालक्ष्मी झिम्मा फुगडी ग्रुप (करंजवडे, ता. वाळवा) व ३५ वर्षे वयोगटावरील गटात शिराळ्याच्या दुर्गामाता मंगळा गौरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटावला.
स्पर्धेचे उद्घाटन आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सुनितादेवी नाईक यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुरज चौगुले, सदाशिव बोंगाणे, राजाभाऊ कदम यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक एस. एम. पाटील यांनी केले. आपला बझार समुहाच्या अध्यक्ष नाईक व मनिषाताई नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. अध्यक्ष नाईक व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आदर्श शिक्षीका पुरस्कार विजेत्या मनिषा मोहिते यांचा आपला बझार अध्यक्ष नाईक यांनी सत्कार केला. कार्यक्रमास दिपाली नाईक, अंकिता नाईक, मृणाल नाईक, सुनिता निकम ,प्रतिभा पवार, सखी मंचच्या अध्यक्ष वैशाली कदम, वर्षा पाटील, अर्चना कदम, कल्पना गायकवाड, वंदना यादव, विजया माने, वैशाली भुयेकर ,प्रचिती सांकृतिक मंचाचे अध्यक्ष डी. एन. मिरजकर, साहित्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष आर. बी. शिंदे उपस्थित होते.
विजेते असे : १८ ते ३५ वयोगट : प्रथम : महालक्ष्मी झिम्मा फुगडी ग्रुप (करंजवडे, ता. वाळवा), द्वितीय : शिवकन्या ग्रुप (वाकुर्डे खुर्द), तृतीय : महालक्ष्मी ग्रुप (नाटोली), चतुर्थ : ग्राम कस्तुरी साहित्य कला मंच (कुसळेवाडी), पाचवा : स्वामी समर्थ महिला गट (गिरजवडे). ३५ वयावरील गट : प्रथम : दुर्गामाता मंगळा गौरी ग्रुप (शिराळा), व्दितीय : मंगळा गौरी ग्रुप (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), तृतीय : शिवसमर्थ महिला बचत गट (उपवळे), चतुर्थ : जनाईदेवी बचत गट (निगडी), पाचवा : अंबिका महिला बचत गट (कणदूर). स्पर्धेत एकूण १५ गटांचा सहभाग होता. दोन्ही गटातील विजेत्या संघाना स्वतंत्र अनुक्रमे दहा, सात, पाच, तीन, दोन हजार रुपये रोख व प्रत्येकी स्मृतिचिन्ह देण्यात आले.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments