BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चला जाणुया नदीला | तिळ गंगा नदी |शिराळा तालुका |Let's go to the river Tila Ganga River |Shirala Taluka


करमाळे (ता.शिराळा)  येथील महादेव डोंगररांगेत असणाऱ्या तीळगंगा नदीच्या उगमस्थानाला दिलेल्या भेटी प्रसंगी जलनायक प्रकाश पाटील सोबत सरपंच सचिन पाटील ,अशोक पाटील,संदीप मदने, मारुती पाटील, सतीश पाटील ,सचिन पाटील, आत्माराम पवार, कृष्णात पाटील, रमेश पाटील 

शिराळा,ता.३० :शिराळा तालुका हा डोंगरी तालुका असून येथे पावसाचे प्रमाण जास्त असले तरी असणाऱ्या पाण्याचा  जलसंधारणच्या  माध्यमातून योग्य पद्धतीने माथा ते पायथा हा उपक्रम राबविल्यास सध्या भेडसावत असणाऱ्या पूर व दुष्काळी या दोन्ही  परिस्थितीवर आपण मात करू शकतो असे प्रतिपादन जलनायक प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.  

करमाळे (ता.शिराळा) येथील महादेव डोंगररांगेत असणाऱ्या तीळगंगा नदीच्या उगमस्थानाला दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, करमाळे गाव शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील आहे.भरपूर पाऊस पडत असुनही गेल्या अनेक वर्षांपासून इथे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. बहुसंख्य लोक मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. वाकुर्डे बुद्रुक योजनेची वाट बघत एक पिढी म्हातारी झाली आहे. गावातील तरूणांनी गाव पाणीदार होण्यासाठी लोकसहभागातून, श्रमदानाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तीळगंगा नदीच्या पुर्नजीवनासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याच तीळगंगा नदीचा उगम येथील  महादेव डोंगररांगेत होतो. पुढे सुरूल - ओझर्डे - पेठ मार्गे ही नदी बहे येथे कृष्णा नदीला  जाऊन मिळते.महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेने देखील येथील पाहणी केली आहे.जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी देखील करमाळे येथे येऊन वाकुर्डे योजनेचे पाणी देण्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे. पण गाव उंचावर असल्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी करमाळ्याच्या तलावात सोडण्यात अडचणीचे ठरत आहेत. त्या ठिकाणी  पाणी साठवण तलावास ९ कोटीची मंजुरी मिळाली आहे. अमीर खान यांनी लवकरच या गावाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी सरपंच सचिन पाटील,  ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील,संदीप मदने, मारुती पाटील, सतीश पाटील ,सचिन पाटील, आत्माराम पवार, कृष्णात पाटील, रमेश पाटील उपस्थित होते. 

वाळवा  -बहे, बनेवाडी ,भाटवाडी, बोरगाव ,धोत्रेवाडी, फार्णवाडी , घबकवाडी ,हुबालवाडी, जांभूळवाडी, काळामवाडी , कापूसखेड,कासेगाव , केदारवाडी ,खरातवाडी, महादेववाडी, माणिकवाडी, मरळनाथपूर, नायकलवाडी, नेर्ले ,ओझर्डे , पेठ ,रेठरे धरण, साखराळे, शेणे ,  सुरूल, तांबवे ,वाघवाडी, वाटेगाव, येवलेवाडी २९ गावे 

शिराळा - बांबवडे, भैरेवाडी ,घागरेवाडी, गिरजवडे, करमाळे ,पाचुंब्री, पं.त.शिराळा,शिवरवाडी, टाकवे ९ गावे  

Post a Comment

0 Comments