BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घरगुती गौरी गणपती विसर्जन |Homemade Gauri Ganpati Immersion




सोनवडे : येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात एकत्रिपणे घरगुती गौरी  गणपती विसर्जनासाठी आलेले नागरिक   

 शिराळा,ता.२३ : शिराळा तालुक्यात अनेक ठिकाणी  घरगुती व सार्वजनिक  गणपती विसर्जनाला वरुण राजाने हजेरी लावल्याने पावसाच्या सरी अंगावर झेलत गणपती बाप्पा मोरया च्या  व पारंपारिक वाद्याच्या  गजरात घरगुती गणपतीचे शांततेत विसर्जन करण्यात आले.

 शिराळा तालुक्यात आज दिवसभर पावसाने उघडीप दिली होती ,मात्र सायंकाळी चार नंतर घरगुती गणपती विसर्जनाच्या वेळी बाहेर पडताना अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केल्याने पावसात भिजत गणपती बाप्पा मोरया च्या जल्लोषात गावागावातून गणपतीची मिरवणूक काढत वारणा नदी, मोरणा नदी, मोठ मोठे ओढे,विहिरी, पाझर तलाव तर काही ठिकाणी घरीच बादली मध्ये गणपती विसर्जन करण्यात आले. शिराळा,सागाव ,मांगले, कोकरूड, शेडगेवाडी,आरळा,चरण, शिरशी,येळापूर, वाकुर्डे ,बांबवडे,मणदूर,सोनवडे,अंत्री या मोठ्या गावात मिरवणुकीने गणपतीचे सवाद्य विसर्जन करण्यात आले. यावेळी गौरी विसर्जनाला मुली व महिलांची मोठी गर्दी होती. इनामावाडी येथील मोरया गणेश  मित्र मंडळाच्या गणपतीचे वारणा नदीत भरपावसात विसर्जन करण्यात आले.


Post a Comment

0 Comments