शिराळा,ता,१० : केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर आलेली बंधने पाहता साखर उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मितीवर जास्त भर देणे जास्त फायदेशीर ठरणार आहे.या वर्षी पाऊस नसल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त साखर विना अडथळा उत्पादित करावी लागणार आहे. केंद्र शासन लोकसभा निवडणुका होईपर्यंत साखर निर्यातीसाठी परवाना देण्याची शक्यता नसल्याने साखर उद्योगात अडचणीचा काळ निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील , विश्वास शिक्षणचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, सुनीता नाईक, डॉ. शिमोनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाईक म्हणाले की , पाऊस नसल्याने कमी दिवसात जास्त गाळप करण्याचे नियोजन केले आहे. डिस्टलरी साठी वेगळी यंत्रणा , प्रतिदिन ७५०० मे टन गाळप करणार आहे. सद्या सर्व कारखाने गाळप व डिस्टलरी क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
संचालक विराज नाईक म्हणाले, की, बायोगॅस , सहवीजनिर्मिती , डिस्टलरी , गाळप याचे आधुनिकीकरण केले आहे. कारखान्याचा केंद्रबिंदू कर्मचारी आहे. उसावर वाढलेले रोग , पाऊस यामुळे १० ते १५ % घट झाली असून उतारा ही कमी पडणार आहे. या हंगामात ७.५ लाख मे टन गाळप चे ध्येय आहे. ऊसतोड यंत्रणा गंभीर विषय बनला आहे. यावर्षी सात हार्वेस्टेड मशीन यंत्रनेचे नियोजन आहे.प्रारंभी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमास संचालक दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, सुरेश चव्हाण, विश्वास कदम, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, सुहास पाटील, कोंडीबा चौगुले, कार्यकारी संचालक अमोल पाटील,सचिव सचिन पाटील सह्याद्री कारखाण्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. संचालक हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments