BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामधन | ग्रामकोष | करमाळे |Gram Dhan | Gram Kosh | Karmale

 

 करमाळे ता.शिराळा येथे  ग्रामधन संकल्पना राबविण्याचा एक मुखी ठराव करताना करमाळे ग्रामस्थ 

शिराळा,ता.३०:  करमाळे ता.शिराळा येथील ग्रामपंचायतने  ग्रामधन संकल्पना गावामध्ये राबवीण्याचा ठराव केला असून ही संकल्पना गावात राबविणारी करमाळे ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. 

 केंद्र व राज्य सरकार यांचेकडे स्वतंत्र निधी असून त्याचा उपयोग देश व राज्यातील विविध  विकासात्मक कामासाठी व नागरीकांच्या सोयी व सुविधा साठी केला जातो. त्याच प्रमाणे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी  गावामध्ये ग्रामधन संकल्पना राबविणे व त्यासाठी ग्रामनियोजन समिती (village planning committee) ची स्थापना करणेत ही महत्वाची संकल्पना आहे. या  निर्मितीची मूळ संकल्पना पाणलोट विकास व व्यवस्थापण केंद्र यशदा पुणे संचा लक प्रदीप गारोळे यांची आहे. ती संकल्पना गावच्या सर्वांगीण विकासासाठी  जालनायक प्रकाश पाटील यांनी करमाळे ग्रामस्थांच्या समोर  मांडली. गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी ही संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला. त्याचे नियोजन, सनियंत्रण, अंमलबजावणी मूल्यमापन करण्यासाठी  ग्रामप्रकाश स्वराज्य बहुउद्देषीय संस्था पेठ ता. वाळवा या संस्थेची तांत्रिक संस्था म्हणून निवड करण्यात आली. या मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था उदा. युएन / युनिसेफ जागतिक बँक, एफ. सी. आर. ए, केंद्र शासन, राज्यशासन, ग्रामस्थांच्या देणग्या, श्रमदान केल्यामुळे निर्माण झालेला निधी ,स्थानिक गौण खनिज,स्थानिक गौण वनउपज,देवस्थान देणग्या निधी, धर्मादाय निधी यांच्या माध्यमातून  ग्रामधन मध्ये आलेला निधी गावच्या विकासाला  हातभार लावू शकतो. यासाठी  ग्रामनियोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच,उपसरपंच ,ग्रामसेवक यांच्या सह वेगवेगळ्या क्षेत्रातील  ,वर्ग १,२ चे अधिकारी, अनिवाशी,सामाजिक कार्यकर्ता, भूमिहीन, पत्रकार,युवक,शेतकरी, अभियंता,व्यवसायिक,अशा १४ जणांचा समावेश आहे.

कोट- स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत यांचेकडे तीसरे सरकार म्हणून बघितले जाते. आज रोजी पाहिले तर ग्रामपंचायतकडे तसा स्वत:चा  निधी तुटपुंजा असतो. तो ग्रामधन च्या माध्यमातून  उपलब्ध करून  गावच्या विकासासाठी वापरणे शक्य आहे. त्यासाठीच करमाळे ग्रामस्थांच्या माध्यामतून आम्ही महाराष्ट्रात हे पहिले पाउल उचलले आहे.

प्रकाश पाटील जलनायक 

गावच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढी सरसावली असून राजकीय गट तट व अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून आम्ही जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोक हिताच्या कामांना नेहमीच प्राधान्यक्रम देत आहोत. त्यासाठीच सर्वानुमते  ग्रामधन संकल्पनेचा  महाराष्ट्रातपहिला ठराव केला आहे.

सचिन पाटील सरपंच 


Post a Comment

0 Comments