शिराळा,ता.९ : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखा. ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या .एक गाव एक गणपतीची संकल्पना गावागावात राबवा. ईद व गणेश विसर्जन एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही सण शांततेत साजरे करा.मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी मंडळाच्या अध्यक्षाने घ्यावी असे प्रतिपादन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले.
शिराळा येथे तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या निमिताने गणेश मंडळाच्या आयोजित बैठकीत बोलत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण म्हणाले, कोणाची भावना दुखावेल असे देखावे दाखवू नये.त्या पेक्षा सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांना अधिक प्राधान्य दया. या काळात आमच्याकडे असणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगात हद्द पार केले जातील. गावागावात शांतता राखा. नोंदणीकृत असणाऱ्या मंडळानी रीतसर परवाने घ्या. परवानगी न घेणाऱ्या मंडळावर कडक कारवाई केली जाईल
तहसीलदार शामला खोत-पाटील म्हणाल्या, उत्सव आनंदाने साजरे करताना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या. सार्वजनिक शांततेचा भंग होऊन देऊ नका. गणेश विसर्जनाला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी.
स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी केले. प्रशिक्षणार्थी तहसीदार संतोष आथरे, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, कुरळपचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे , निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष संजय परीट, सचिव मोहन घागरे, डॉ.सीताराम पाटील, योगेश मस्कर,युवराव पाटील,सुधीर पवार, संदीप शिंदे, भरत चव्हाण, विकास शिरसट, बाबासाहेब वरेकर ,नीलम सूर्यवंशी उपस्थित होते.आभार सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी मानले. ज्योतिबा जोशी यांनी सूत्रसंचलन केले.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments