शिराळा : गेल्या दोन दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरण सोमवारी सायंकाळी शंभर टक्के भरले आहे.चांदोली धरण ३४.४० टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेले महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण असुन धरणात ३४.४० टिएमसी पाणीसाठा झाला आहे.सध्या धरणाची पाणीपातळी ६२६.८० मीटर इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात १४ मिलीमीटर तर आजअखेर १ हजार ६३४ मिलीमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे. सध्याच्या संततधार पावसामुळे धरणात १ हजार १०२ क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. सध्यातरी धरणाच्या पायथ्याशी असलेले वीजनिमिर्ती केंद्र बंद असुन धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments