शिराळा,ता.२६ :संघाच्या दूध संकलन वाढीसाठी नवीन दूध उत्पादक व संघाच्याच माध्यमातुन बफेलो पार्क उभारणार असून आमदार मानसिंगराव नाईक यांच्या सहकार्याने हा मानस प्रत्यक्षात लवकरच साकारला जाईल असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी केले.
बिऊर ता,शिराळा येथे फत्तेसिंगराव नाईक दुध संघाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, संघास दूध पुरवठा करणा-या सर्व शेतकरी दूध उत्पादकांच्या दूध व्यवसायाच्या वाढीसाठी संघ त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहील.
भूषण नाईक म्हणाले, मुंबई येथील संघाच्या दूग्ध प्रकल्पामुळे शिराळा तालुक्याच्या दूध व्यवसायास गतीमान दिशा मिळणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या फायदयामध्ये वाढच होत जाईल. संघाच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी दूध उत्पादकांना दूध उत्पादन क्षेत्रातील अध्यावत माहिती देण्यासाठी वेगळा विभाग तयार करणार आहोत.
यावेळी संघातील कर्मचा-यांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या विशेष प्राविण्यावदल व संघास म्हैस, गाय जास्तीत जास्त दूध पुरवठा, गुणपत दूध पुरवठा, आदर्श दूध संस्था अशा विविध बाबतीत बक्षीस मिळविलेल्या संस्था प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक संचालक एस. वाय. यमगर यांनी केले. ठरावाचे वाचन प्रभारी सचिव समृध्दी चव्हाण यांनी केले. सर्व ठराव एक मताने मंजुर करण्यात आले. संचालक बबन पाटील, व्यवस्थापक दिनकर नायकवडी, कार्यकारी संचालक रविंद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रथमेश शिंदे यांनी केले. या सभेस संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, संचालक संजय पाटील, प्रणव पाटील, श्रीरंग भोसले, मानसिंग पाटील, शिवाजी लाड गणेश पाटील माणिक दशवंत, लक्ष्मण पाटील,तुकाराम सावंत, नामदेव पडवळ, शरद पाटील, संजय शिंदे, रूपाली पाटील, मनिषा यादव, मंगला पाटील उपस्थित होते.आभार अनिल पाटील यांनी मानले.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments