BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटारसायकल अपघातात अनिल कर्ले युवक ठार |Anil Karle youth killed in motorcycle accident



मोटारसायकल अपघातात अनिल  कर्ले युवक ठार |Anil Karle youth killed in motorcycle accident

शिराळा,ता.१३ :येथील कापरी फाटा येथे  मोटारसायकल अपघातात अनिल अर्जुन कर्ले ( वय ३० , रा.फकिरवाडी , ता.शिराळा ) या युवकाचा मृत्यू झाला.  सदर घटना मंगळवार ता.१२ रात्री ८  च्या दरम्यान घडली. याबाबत रात्री उशिरा शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत अनिल चा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचे वडील अर्जुन कर्ले यांनी दिल्याने  पोलिसांनी आज  ता. १३ रोजी त्या परिसरातल्या सी सी.टी.व्ही  तपासले असता अनिलने  रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्यास धडक दिली. यामुळे त्याचा मोटारसायकल वरील ताबा गेल्याने गाडीवरून रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात  निष्पन्न झाले आहे.

   याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अर्जुन कृष्णा कर्ले ( वय ६०) यांनी  दिलेल्या फिर्यादी  नुसार मयत अनिल  कर्ले हे मोटारसायकल  वरून शिराळा कापरी नाका येथून बाह्य वळण रस्त्या मार्गावरून फकिरवाडी येथे निघाले होते. यावेळी अज्ञात वाहनाने अनिलच्या मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम व पोलीस कर्मचाऱ्यांनी  तातडीने भेट दिली .अज्ञात वाहनाचा शोध घेतला. अज्ञात वाहन व अज्ञात चालक याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात बेजबाबदारपणे वाहन चालवून  मोटरसायकलला धडक देऊन चालकास गंभीर दुखापत केली , अपघाताबाबत पोलीस ठाण्यास माहिती दिली नाही, जखमीला उपचारासाठी नेले नाही. त्यामुळे मृत्यूस व मोटारसायकल नुकसानीस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पुढील  तपास हवालदार सुनील पेटकर हे करीत आहेत.मयत अनिलच्या  पश्चात  आई ,वडील , लहान भाऊ असा परिवार आहे.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments