BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शालेय मुलांच्यासाठी दलित महासंघाच्यावतीने एन.आय.ई अंकाचे वाटप |Allotment of NIE on behalf of Dalit federation for school children



 बिळाशी ता.शिराळा येथे वारणा प्रसाद विद्यालयात विध्यार्थाना  दलित महासंघाच्या वतीने  दै.सकाळ च्या एन.आय.ई अंकाचे वाटप करताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे सोबत मुख्याध्यापक  व्ही.एम.पाटील,पर्यवेक्षक ए.आर.कुलकर्णी ,शिवाजीराव चौगुले,अभिजित यादव 

बिळाशी,ता.३ : मोबाईलच्या युगात  लोप पावत चाललेली वाचन चळवळ गतिमान करण्या बरोबर मुलांचा  शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी  दलित महासंघाच्या सकाळच्या एन.आय.ई च्या  माध्यमातून प्रयत्नशील  असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुधाकर वायदंडे यांनी केले. यावेळी विध्यार्थ्यानी सकाळच्या एन.आय.ई अंकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

बिळाशी ता,शिराळा येथे वारणा प्रसाद विद्यालयात दलित महासंघाच्या वतीने  दै.सकाळ च्या एन.आय.ई (newspaper in education) या ज्ञान,माहिती आणि मनोरंजनावर आधारित  शैक्षणिक अंकाच्या वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी वायदंडे म्हणाले, शैक्षणिक अंकामध्ये  ५  वी ते १०  वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, विज्ञान ,वेगवेगळे छंद ,चित्रकला, श्लोक, दिनक्रम, व्यायाम, धमाल विनोद अशा विविध  शालेय इतर घडामोडींचा शैक्षणिक खजिना  उपलब्ध होणार आहे. याचा निश्चित मुलांना फायदा होणार आहे. 

   यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील,पर्यवेक्षक ए.आर.कुलकर्णी ,अशोक वाघमारे  यांच्या हस्ते या अंकाचे वितरण   करण्यात आले. यावेळी गंगाराम तांबीरे,संतोष शिंदे,मयूर घाटे,नवज्योत घाटे, वैभव शिंदे, रोहित घाटे,उमेश चांदणे ,दै.सकाळचे तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले, वितरण प्रतिनिधी अभिजित यादव यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अजित परीट यांनी केले. आभार आनंदा बांदीगरे  यांनी मानले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments